1 min read

असोदा येथील सार्वजनिक विद्यालयात स्वच्छता संवाद कार्यक्रम चे थेट प्रक्षेपण

Loading

असोदा येथील सार्वजनिक विद्यालयात स्वच्छता संवाद कार्यक्रम चे थेट प्रक्षेपण
दिनांक-२६/०९/२०२३ मंगळवार रोजी स्वच्छता संवाद कार्यक्रम मा.ना. गुलाबराव पाटील , पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री, पालकमंत्री जळगाव त्यांच्या उपस्थितीत सकाळी-११ ते १२ या कालावधीत VC प्रणाली द्वारे राबविण्यात आली. सार्वजनिक विद्यालयातील विद्यार्थ्यांना प्रोजेक्टर द्वारे स्वच्छता संवाद कार्यक्रम लाईव्ह दाखवण्यात आला.
महात्मा गांधी यांची जयंती दोन ऑक्टोबर या निमित्ताने 15 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर हा पंधरवाडा भारतभरात ‘स्वच्छता ही सेवा’ म्हणून राबवण्यात येतो. त्या निमित्ताने या कार्यक्रमाचे प्रक्षेपण सार्वजनिक विद्यालयात करण्यात आले . याप्रसंगी विद्यालयाचे मुख्याध्यापक डॉ.मिलिंद बागुल, पर्यवेक्षक एल.जे. पाटील, उपशिक्षक गोपाळ महाजन, एच ए. साळुंखे मॅडम, प्रयोगशाळा सहाय्यक उपेंद्र चौधरी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *