1 min read

कोल्हापूर येथे शालेय राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेत ठाणे जिल्ह्यातील कुस्तीगीरांचे वर्चस्व. ठाणे जिल्ह्यातील कुस्तीगिरांची 3 सुवर्ण,1 रौप्य आणि 5 कांस्यपदक असे एकूण 9 पदके जिंकून उल्लेखनीय कामगिरी.

Loading

कोल्हापूर येथे शालेय राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेत ठाणे जिल्ह्यातील कुस्तीगीरांचे वर्चस्व. ठाणे जिल्ह्यातील कुस्तीगिरांची 3 सुवर्ण,1 रौप्य आणि 5 कांस्यपदक असे एकूण 9 पदके जिंकून उल्लेखनीय कामगिरी.
आंतरराष्ट्रीय कुस्तीगीर, आंतरराष्ट्रीय कलानिकेतन व्यायामशाळेचा उगवता तारा पै.ओमकार कराळे सुवर्णपदकाचा मानकरी.
मुंबई:(मनिलाल शिंपी)ठाणे: दि.25 सप्टेंबर 2023 रोजी कोल्हापूर येथील 17 वर्षाखालील शालेय राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेत आंतरराष्ट्रीय कलानिकेतन व्यायाम शाळेचा उगवता तारा,आंतरराष्ट्रीय कुस्तीगीर , पै.यशवंत कराळे यांचा नातू पै.ओमकार संतोष कराळे यांनी 45 किलो ग्रिको रोमन कुस्ती स्पर्धेत सुवर्णपदक,ठाकूरपाडा गावचे सुपुत्र,गंगाराम महाराज ठाकरे यांचे नातू,राष्ट्रीय कुस्तीगीर पै.हर्ष दीपक ठाकरे यांनी 92 किलो ग्रिको रोमन कुस्ती स्पर्धेत सुवर्णपदक,51 किलो वजनीगटात पै.साईनाथ पारधी यांनी सुवर्णपदक,सरवली गावचे सूप राष्ट्रीय कुस्तीगीर पै.हर्षद प्रविण चौधरी यांनी 51 किलो ग्रिको रोमन कुस्ती स्पर्धेत कांस्य पदक,तिसगावचे सुपुत्र पै. दुर्वेश म्हात्रे यांनी 110 किलो वजनी गटात रौप्य पदक तर सोनाळे गावचे सुपुत्र पै.क्रिश शांताराम पाटील यांनी 48 किलो वजनी गटात कांस्यपदक जिंकले,सरवली गावचे सुपुत्र पै.स्वराज प्रल्हाद चौधरी यांनी 55 किलो ग्रिको रोमन कुस्ती स्पर्धेत कांस्य पदक जिंकले. तर कल्याण नांदिवली जय बजरंग व्यायामशाळेची कुस्तीगीर पै.प्रिया मोरे हिने 57 किलो वजनी गटात कांस्यपदक जिंकले.
२ऑक्टोबर ते 8 ऑक्टोबर 2023 रोजी मध्यप्रदेश येथे होणाऱ्या राष्ट्रीय शालेय कुस्ती स्पर्धेसाठी पै.ओमकार संतोष कराळे ,पै.हर्ष दिपक ठाकरे,पै.साईनाथ पारधी यांची निवड झाली.
आंतरराष्ट्रीय कुस्तीगीर पै.ओमकार कराळे,पै.हर्ष ठाकरे,पै.हर्षद चौधरी हे रुस्तुम ए हिंद अकॅडमी पुणे येथे रुस्तुम ए हिंद पै.अमोल बुचडे,पै.नरेंद्र कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करतात.*
सर्व विजयी कुस्तीगीर,मार्गदर्शक,वस्ताद,शिक्षक वर्ग आणि पालक यांचे केंद्रीय पंचायत राज राज्यमंत्री मा.श्री.कपिल पाटील साहेब,महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेचे अध्यक्ष,लोकनेते सन्मानीय शरद पवार साहेब,कार्याध्यक्ष नामदेवराव मोहिते,सरचिटणीस बाळासाहेब लांडगे,खजिनदार सुरेशदादा पाटील,महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेचे वरीष्ठ उपाध्यक्ष सर्जेराव आबा शिंदे,संभाजी वरुटे,दयानंद भक्त,गणेश कोहले,तांत्रिक सचिव बंकट यादव,कार्यालयीन सचिव ललित लांडगे,कार्यकारी सदस्य अमृता भोसले,संपत साळुंखे,विनायक गाढवे,अखिल भारतीय शैली कुस्तीचे सहसचिव शेखर शिंदे,आंतरराष्ट्रीय कुस्ती मार्गदर्शक उत्तमराव पाटील, महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेचे विभागीय सचिव श्री.मारुती आडकर,कार्यकारी सदस्य सुभाष ढोणे,सुभाष घासे,श्याम काबुलीवाले,सुनिल देशमुख,पंढरीनाथ ढोणे (बापू) अध्यक्ष-कल्याण डोंबिवली कुस्तीगीर संस्था,रायगड कुस्तीगीर संघाचे मा.अध्यक्ष मा.आमदार बाळाराम पाटील,हातमाग महामंडळाचे अध्यक्ष श्री.प्रकाश पाटील साहेब,महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेचे प्रतिनिधी,मा.सरपंच,हभप गंगाराम महाराज ठाकरे,ठाणे शहर संघाचे अध्यक्ष सुरेश ठाणेकर,भिवंडी तालुका कुस्तीगीर संघटनेचे अध्यक्ष श्रीधर पाटील,बंडू हनुमान पाटील मा.सदस्य-पंचायत समिती भिवंडी,श्री.दयानंद चोरघे,श्री.विनोद ठाकरे,डॉ.यशवंत सोरे,डॉ.सोन्या पाटील, ठाणे जिल्हा तालीम संघाचे सरचिटणीस प्रकाश गोंधळी,आंतरराष्ट्रीय पंच विकास पाटील,राष्ट्रीय पंच प्रा.श्रीराम पाटील,युवराज पाटील,सतिश म्हात्रे,दिलीप पवार,दत्ता माने,हनुमंत जाधव,डॉ.संतोष भुजबळ,युवराज पाटील,रवि बोत्रे,संभाजी पाटील,मंगेश डोंगरे,प्रा.किसन बुचडे,धोंडीबा लांडगे,उमेश चौधरी,चंद्रकांत मोहोळ,आयुब मुल्ला,अजय साबळे,प्रकाश सावंत,रमेश भोसले,सतिश कदम,राजेंद्र कुंभार,भालचंद्र भोपी,शैलेंद्र पाटील,विष्णू पाटील,किसन भोईर,प्रज्वलदीप ढोणे,गणेश पाटील, राजेश कराळे,जयनाथ पाटील,नरेंद्र पाटील,मुकुंद मढवी,राजू चौधरी,गुरुनाथ पाटील,दिपक ठाकरे,डॉ.तपण पाटील, युवंजय पाटील, श्रीराम धोंडल,मदन चिकणकर आणि महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेचे पदाधिकारी,तांत्रिक अधिकारी,पंच, प्रशिक्षक,मान्यवर, वस्ताद कुस्तीगीर, यांनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.
आंतरराष्ट्रीय कुस्तीगीर,राष्ट्रीय स्पर्धेत 3 सुवर्ण,एक रौप्यपदक आणि एक कांस्यपदक विजेता,ठाणे जिल्ह्याचे सर्वोत्तम कुस्तीगीर पै.ओमकार कराळे आणि राष्ट्रीय कुस्तीगीर पै.हर्ष ठाकरे यांनी सुवर्णपदक जिंकले भविष्यात राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय कुस्ती,राष्ट्रकुल स्पर्धेत,ऑलिम्पिक स्पर्धेत पदक जिंकून एक नवा इतिहास घडवून ठाणे जिल्ह्याचे,महाराष्ट्राचे नाव रोशन करणारच असे राष्ट्रीय पंच,कुस्ती मार्गदर्शक,कलानिकेतन मंडळाचे अध्यक्ष डॉ. प्रा.विनोद हनुमान पाटील कोनकर यांनी सांगितले.
पंचक्रोशीतील सर्व सरपंच,उपसरपंच,मान्यवर,वस्ताद कुस्तीगीर,तसेच सरवली गावचे आजी,माजी सरपंच तुकाराम चौधरी,सौ.संध्या नितेश चौधरी, ग्रामपंचायत सदस्य,ग्रामस्थ,कुस्तीगीर,मार्गदर्शक,वस्ताद यांनी सुवर्णपदक,रौप्यपदक,कांस्यपदक पदक जिंकल्याबद्दल सर्व विजयी कुस्तीगीरांचे हार्दिक अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
आंतरराष्ट्रीय कुस्तीगीर,आंतरराष्ट्रीय कलानिकेतन व्यायामशाळेचा उगवता तारा,ठाणे जिल्ह्याचा सर्वोत्तम कुस्तीगीर पै.ओमकार संतोष कराळे यांनी सुवर्णपदक जिंकल्याबद्दल कलानिकेतन मंडळाचे अध्यक्ष डॉ.प्रा.विनोद हनुमान पाटील,भाजपा विधानसभा क्षेत्र अध्यक्ष पै.प्रमोद हनुमान पाटील,कोनगावच्या सरपंच श्रीमती रेखा सदाशिव पाटील, मा.नगरसेवक, भाजपचे कल्याण शहर अध्यक्ष वरुण पाटील,आठगांव शिक्षण मंडळाचे अध्यक्ष टी आर पाटील,गजानन पाटील महाविद्यालयाचे सचिव विजयानंद पाटील,चंद्रकांत पाटील,गंगाराम पाटील,अशोक म्हात्रे मा.उपसरपंच भरत जाधव,पांडुरंग कराळे,जागृत रिपोर्टरचे संपादक अफसर खान,हनुमान अर्जुन म्हात्रे, गोरक्ष भगत,भाजपा अध्यक्ष चारुदत्त पाटील , भाजपा शहर अध्यक्ष .हनुमान म्हात्रे,कमलाकर नाईक,संतोष पाटील,जयंत टावरे,कोकण केसरी हरेश कराळे,सचिन कराळे,पै.पंकज कराळे,प्रविण पाटील,सर्व आजी माजी ग्रामपंचायत सदस्य,कलानिकेतन मंडळाचे सर्व आजी,माजी पदाधिकारी,सर्व कुस्तीगीर,विविध संस्थेचे पदाधिकारी,ग्रामस्थ यांनी हार्दिक अभिनंदन करून पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा देण्यात येत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *