विरोधात बातमी न येण्यासाठी पत्रकारांना धाब्यावर घेऊन जाण्यासंबंधीचे
चंद्रशेखर बावनकुळे यांचे वक्तव्य म्हणजे सत्तेचा उन्माद होय-एस.एम.देशमुख
![]()
विरोधात बातमी न येण्यासाठी पत्रकारांना धाब्यावर घेऊन जाण्यासंबंधीचे
चंद्रशेखर बावनकुळे यांचे वक्तव्य म्हणजे सत्तेचा उन्माद होय-एस.एम.देशमुख

मुंबई- पत्रकारांनी 2024 पर्यंत आपल्या विरोधात एकही बातमी छापू नये यासाठी त्यांना चहा प्यायला घेऊन जा. त्यांना चहा प्यायला बोलवायचे म्हणजे समजलेच असेल तुम्हाला, असे सांगत त्यांना धाब्यावरही घेऊन जा, असा सल्ला भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी अहमदनगर येथील पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत दिला. सदर बैठकीतील चंद्रशेखर बावनकुळे यांचे वक्तव्य हे निषेधार्ह व संतापजनक असून कोणालाही आपण विकत घेऊ शकतो ही मानसिकता म्हणजे सत्तेचा उन्माद आहे या शब्दात अ.भा. मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस.एम. देशमुख यांनी बावनकुळे यांच्या वक्तव्याचा तीव्र निषेध केला आहे. एस.एम. देशमुख यांनी पुढे म्हटले आहे की, ‘सारेच पत्रकार विकावू नाहीत’ हे बावनकुळे यांना निवडणूकीच्या वेळेस नक्कीच दिसेल. भाजपनं आपल्या वाचाळवीरांना आवरलं नाही तर त्यांच्यावर नक्कीच हात चोळत बसण्याची वेळ येणार आहे. पत्रकारांसंबंधी केलेल्या या संतापजनक वक्तव्यावर भाजपा व चंद्रशेखर बावनकुळे यांनी पत्रकारांची माफी मागितली पाहिजे अन्यथा गाठ पत्रकारांशी आहे असाही इशारा एस.एम.देशमुख, विश्वस्त किरण नाईक, अध्यक्ष शरद पाबळे , कार्याध्यक्ष मिलींद अष्टीवकर, सरचिटणीस हाजी मन्सुरभाई शेख, कोषाध्यक्ष विजय जोशी, महिला आघाडीच्या जान्हवी पाटील, शोभा जयपूरकर, डिजिटल मिडीयाचे राज्याध्यक्ष अनिल वाघमारे आदींनी दिला आहे.

