1 min read

माध्यमिक विद्यालय शिंदी ता.भडगाव येथे कर्मवीर तात्यासाहेब यांच्या २२ व्या पुण्यस्मरण सप्ताहाचे दुसरे पुष्प संपन्न

Loading

माध्यमिक विद्यालय शिंदी ता.भडगाव येथे कर्मवीर तात्यासाहेब यांच्या २२ व्या पुण्यस्मरण सप्ताहाचे दुसरे पुष्प संपन्न

भडगाव प्रतिनिधी(मराठी लाईव्ह न्युज प्रतिनिधी अश्विन पाटील) आज दि २४ सप्टेंबर २०२३ सोमवार रोजी कर्मवीर तात्यासाहेब हरी रावजी पाटील किसान शिक्षण संस्था भडगाव संचलित माध्यमिक विद्यालय शिंदी ता. भडगाव येथे संस्थेचे संस्थापक चेअरमन कर्मवीर तात्यासाहेब यांच्या २२व्या पुण्यस्मरण सप्ताह अंतर्गत दुसऱ्या दिवशी संगीत खुर्ची ,१००मीटर धावणे,गाढवाला शेपुट लावणे,लिंबू चमचा या स्पर्धा मोठ्या उत्साहात संपन्न झाल्या. १००मीटर धावणे स्पर्धेत ५ ते ७ व ८ ते १० दोन्ही गटातून जवळपास ४५ विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला.
सदर प्रसंगी विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. आर.डी.महाजन सर यांनी उद्घाटन करुन विद्यालयाचे जेष्ठ शिक्षक श्री.एस.एस.पाटील सर परिक्षण केले.तसेच यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व स्पर्धाचे समिती सदस्य व सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी बंधु भगिनी यांनी स्पर्धा यशस्वी रित्या पार पाडण्यासाठी मेहनत घेतली.
तसेच आज २४ सप्टेंबर रोजी सत्यशोधक समाज स्थापना दिवस असल्याने सत्यशोधक समाजाचे संस्थापक महात्मा ज्योतिराव फुले यांच्या प्रतिमेचे पूजन विद्यालयाचे मुख्याध्यापक दादासाहेब श्री.आर.डी.महाजन सर यांच्या शुभ हस्ते करण्यात आलेयाप्रसंगी महात्मा ज्योतिराव फुले यांच्या जीवन कार्याचा परिचय विद्यालयातील उपशिक्षक श्री.आर.पी.पाटील सर यांनी करून दिला

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *