कळमसरे येथे अनाधिकृत गौण खनिज करणारे ट्रँक्टर रंगेहाथ पकडले..
![]()
कळमसरे येथे अनाधिकृत गौण खनिज करणारे ट्रँक्टर रंगेहाथ पकडले..
उपविभागीय अधिकारी व तहसीलदार यांच्या पथकाची कामगिरी

अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)
अमळनेर तालुक्यात गौणखनीजावर कारवाई करण्यात येत असल्यामुळे सध्या कारवईच्या भितीने गौणखनीज मालकामध्ये उपविभागीय अधिकारी महादेव खेडेकर व तहसीलदार रूपेशकुमार सुराणा यांनी चांगली दहशत निर्माण केल्यामुळे शहरातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.
सविस्तर माहिती अशी कि आज रोजी दि. 25/09/2023 रोजी दुपारी 7.30 वाजता मौजे कळमसरे येथील जि. प. शाळा जवळ तांदळी रस्ता वर येथे मा.उपविभागीय अधिकारीसो अमळनेर भाग श्री.महादेव खेडकर साहेब तसेच मा.तहसीलदारसो अमळनेर श्री.रुपेशकुमार सुराणा साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली एक अनधिकृत गौण खनिज रेती वाहतूक करणारे ट्रॅक्टर आढळल्याने ते पकडण्यात आले. सदर ट्रॅक्टर मुद्देमालासह पोलीस स्टेशन मारवड येथे जमा करण्यात आले. पथकात मंडळ अधिकारी श्री सुरेश आर. बोरसे, तलाठी निंब/शहापुर श्री. जितेंद्र जोगी, तलाठी मारवड श्री मनोहर भावसार, श्री विकास परदेशी तलाठी जैतपीर, कोतवाल शहापुर वासुदेव तिरमले, कोतवाल कळमसरे आधार सोनवणे हे होते..

