1 min read

अंतर्मनातल्या आठवणीतले नानासाहेब युवराज पाटील….

Loading

अंतर्मनातल्या आठवणीतले नानासाहेब युवराज पाटील….

कदम ऐसा चलो की निशान बन जाये!

काम ऐसा करो की,पहचान बन जाये!

यहाँ जिंदगी तो सभी जी लेते है!

मगर जिंदगी जियो तो ऐसी!

की सबके लिए मिसाल बन जाये! ज्ञानाने माणूस मोठा होता असला तरी ज्ञानाला संस्काराची जोड मिळाली तरच माणुसकीचा व माणसातील माणूसपणाचा एक चांगला आविष्कार पहावयास मिळतो याचे ज्वलंत उदाहरण नानासाहेब युवराज पाटील...

शून्यातून विश्व निर्माण करणारे, शिक्षणापासून वंचित सातपुड्यांच्या द-याखो-यात राहणा-या आदिवासी विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी अहोरात्र झटणारे शिक्षकांचे ज्ञान वृद्धिंगत होऊन आजच्या काळात शिक्षक कसा अपडेट होईल याची गुणवत्ता कशी वाढेल याचा विद्यार्थ्यांसाठी कसा उपयोग करता येईल यासाठी सदैव
प्रयत्नशील असणारे, शिक्षण क्षेत्रातील बदल तात्काळ अमलात आणणारे, चिकित्सवृती, अभ्यासू, व्यक्तिमत्व दुरदृष्टी असणारे श्री चिंतामणी महिला एज्युकेशन सोसायटीच्या इवल्याशा रोपटयाचे बहारदार वटवृक्षात रूपांतर करणारे आमचे आधारस्तंभ आदरणीय नानासाहेब युवराज पाटील यांचा आज वाढदिवस..
आदर्श व्यक्तिमत्व म्हणून जगण्यासाठी आयुष्यभर झिजावे लागते. तुम्ही आयुष्यभर समाजासाठी आदर्श उभा राहिल असे काम केले. त्यामुळे आज समाजामध्ये तुमचे नाव आहे आणि याच गोष्टीचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. आपल्या जगण्यातला संघर्ष आम्ही जवळून बघितला आहे .चिंतामणी रोपट्याचे वटवृक्षात रूपांतर करण्यासाठी आपण जी अपार कष्ट मेहनत घेतली आहे ती अतिशय वाखण्याजोगी आहे. जीवनात अनेक संकटे आली परंतु न डगमगता आपला संघर्षमय जीवनप्रवास खूप खडतर आहे या जीवनाच्या प्रवासात साथ खूप महत्त्वाची असते आणि ती मोलाची साथ दिली ती माईसाहेब विद्याताई पाटील यांनी ….त्यांनी नेहमीच सकारात्मक ऊर्जा देऊन प्रोत्साहित केले व जीवनाच्या प्रवासात खांद्याला खांदा लावून आपणासोबत उभ्या राहिल्या.. जीवनात आपल्याकडून शिकण्यासारखे खरच खूप आहे… जीवन जगत असतांना शिस्त किती महत्त्वाची असते, वक्तशीरपणा, समय सुचकता, नम्रता, संस्कारक्षम वृत्ती, काटेकोरपणा इत्यादी गुणांनी परिपूर्ण असलेले आमचे प्रेरणास्थान आदरणीय नानासाहेबाच्या चेहऱ्यावरचा उत्साह तरुणांनाही लाजवतो…
आयुष्यात जगत असतांना सुखदुःख येत असतात परंतु आपली साथ आमच्यासाठी सदैव सुखदायी आहे ..नाते कसे टिकवावे आणि माणसे कसे जोडावी हे नेहमी नेहमी आपणाकडून शिकलो..आपण माणसे जोडत गेलात.. नाती जपत गेलात त्यातील आपले एक नाते आहे माझे भाग्य थोर की मला आपल्यासारख्या व्यक्तीचा सहवास लाभला या वाढत्या वयाबरोबर आपले आरोग्यही सुदृढ होत जावो .. आपल्या जीवनातील यश, कीर्ती आणि आनंद वाढत जावो.. आपल्या आयुष्यात आजपर्यंत आपण जसे आनंदाने जगालात तसाच आनंद आपल्या आयुष्यात कायम वाढत राहो.. कारण आपण आहात आमचे प्रेरणास्थान, आमचा स्वाभिमान, तुमचा वाढदिवस आमच्यासाठी आहे खूप खास…
नानासाहेबांसारख्या आदर्श व्यक्तिमत्त्वाचे गुणगान करावे तेवढेच थोडेच आहे… आपणच माझे आदर्श आहात… आपल्यासारख्या आदर्श व्यक्तिमत्त्वाचा मला सहवास लाभला हे माझे परम भाग्यच या निमित्ताने माझ्या परिवाराकडून आपणास वाढदिवसाच्या मंगलप्रसंगी खूप खूप शुभेच्छा आपणास वाढदिवसाच्या निमित्ताने दोन शब्द….

माणसांच्या या गर्दीत अनेक चेहरे भेटतात…
काही चांगले, काही वाईट
काही कधीच लक्षात न राहणारे
आणि काही कायमचे मनात घर करणारे..
मनात घर करणारी जी अनेक माणसं
जगतांना लाभली त्यातले एक तुम्ही!
म्हणूनच, या वाढदिवसानिमित्त आपुलकीच्या शुभेच्छा !

शुभेच्छुक
स्वप्निल व सौ नीलम पाटील परिवार मेहरगाव ता.अमळनेर
94203 46647

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *