1 min read

मानवसेवा हीच ईश्वरसेवा ग्रुपचा उल्लेखनीय उपक्रम इच्छामनी, व स्वरांगी महिला भजनी मंडळाचा माऊलींनी साडी भेट. माउलींचा हरिपाठामुळे माझा वाढदिवशी विठुरायाचे दर्शन लाभले :: डॉ.किशोर पाटील

Loading

मानवसेवा हीच ईश्वरसेवा ग्रुपचा उल्लेखनीय उपक्रम इच्छामनी, व स्वरांगी महिला भजनी मंडळाचा माऊलींनी साडी भेट. माउलींचा हरिपाठामुळे माझा वाढदिवशी विठुरायाचे दर्शन लाभले :: डॉ.किशोर पाटील

ठाणे:कल्याण ( प्रतिनिधी )मानव सेवा हीच ईश्वरसेवा ग्रुपचे प्रमुख डॉ.मनिलाल शिंपी यांचा संकल्पनेनुसार, दैनिक स्वराज्य तोरण चे संपादक डॉ किशोर बळीराम पाटील यांच्या वाढदिसानिमित्त, कल्याण पश्चिम योगिधाम येथील साई मंदिरात साईधाम महिला मंडळाचा अध्यक्षा सौ. जया जाधव यांचा उपस्थितीत, समाजकल्याण न्यास चे संस्थापक अध्यक्ष धर्मसेवक डॉ.सोन्या पाटील,कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव डॉ यशवंत म्हात्रे,स्वामीनारायण हॉल चे संचालक डॉ. दिनेश भाई ठक्कर, समाजसेवक उद्योजक डॉ रामचंद्र देसले, पोलिस पाटील संघाचे अध्यक्ष सोमनाथ ठाकरे, राजस्थान नामदेव समाज सचिव नटवर वर्मा,डोंबिवली रोटरी क्लबचे सचिव , मोटीव्हेशनल स्पीकर डॉ. किशोर अढळकर , यांचा सहकार्याने , भिमाशंकर वारकरी संप्रदाय , महिला भजनी मंडळाच्या माउलींना साडी वाटप करण्यात आले.यावेळी ह.भ. प.सांगळे बुवा महाराज, ढोलक वादक प्रदीप बुवा, तांबे बुवा, स्वरांगी भजनी मंडळाचा अध्यक्षा सौ.बबिता तवर, व इच्छामणी महिला भजनी मंडळाचा अध्यक्षा सौ. संगिता पस्टे यांनी विशेष सहकार्य केले.तसेच साई कृपा महिला मंडळाचा अध्यक्षा सौ. जया जाधव यांच्या हस्ते भजनी मंडळाच्या माउलींना साडी वाटप करण्यात आले.सौ.जया जाधव यांनी मानवसेवा हीच ईश्वरसेवा ग्रुपचे कार्य पाहून खूप कौतुक केले आणि यापुढे माझाही सहभाग राहील असे सांगितले. कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव डॉ यशवंत म्हात्रे यांनी डॉ.किशोर पाटील यांना शुभेच्छा देताना सांगितले की, शिंपी सरांनी आम्हाला वाढदिवस कसा आनंदात साजरा करावा याची दिशा उपलब्ध करून दिली. वारकरी संप्रदाय महिला भजनी मंडळाच्या माउलींचा रुपात खऱ्या अर्थाने आम्हाला रुख्मिणी मातेचे दर्शन घडले आहे आयुष्याचे सार्थक होईल असा उपक्रम राबविला त्याबद्दल मानवसेवा ग्रुप मधील सर्वांचे मनापासून धन्यवाद व्यक्त केले. कल्याण वारकरी संप्रदाय उपाध्यक्ष ह.भ. प. सांगळे बुवा महाराज यांनी डॉ.किशोर पाटील यांना आशिर्वाद देत सांगितले की माझा आयुष्यात आज पहिल्यांदा कोणीतरी आपला वाढदिवस वारकरी संप्रदाय महिला भजनी मंडळाच्या माउलींचा हरिपाठ संकीर्तन आयोजित करून साडीचोळी भेट देऊन आशिर्वाद घेतले .खरोखर मानवसेवा हीच ईश्वरसेवा ग्रुपचे कार्य कौतुकास्पद,आणि अभिमानास्पद आहे.तसेच पत्रकार बांधव हे आपल्या समाजापर्यंत विठ्ठल भक्तीचे वारकरी संप्रदायाचे महत्व पोहचवण्याचे कार्य करीत असतात, अश्या शब्दात पत्रकार बंधूंचा गौरव करत उपरणे , टोपी,आणि गुलाबपुष्प देऊन सन्मान केला. डॉ.किशोर पाटील यांनी सांगितले की,आजचा दिवस माझासाठी खूप अकविस्मरणीय आहे, आज या माऊलींनी हरिपाठ संकीर्तन आयोजित करून खऱ्या अर्थाने विठू माऊली चा दरबारात असल्याचे वाटत आहे. सर्व माऊलींचे आभार व्यक्त केले.भजनी मंडळासाठी संगीत साहित्य उपलब्ध करून देण्यात येईल असेही सांगितले.तसेच यावेळी स्वच्छ भारत अभियान चे मृत्युंजय शुक्ला ,आणि बिपिन मिश्रा यांचाही सत्कार करण्यात आला.कार्यक्रम यशस्वीतेसाठी आर एस पी अधिकारी भगवान परदेशी, अजय जडेजा, तवर बुवा, अरुणा बंसोल,दुर्गावती चौधरी, यांनी विशेष परिश्रम घेतले.संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन, आयोजन मानवसेवा हीच ईश्वरसेवा ग्रुपचे प्रमुख डॉ. मनिलाल शिंपी यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *