1 min read

उज्जैनकर फाउंडेशन मुक्ताईनगर तर्फे पारंबी विद्यालयास शालेय क्रीडा स्पर्धेसाठी विद्यार्थ्यांना टी-शर्ट सप्रेम भेट

Loading

उज्जैनकर फाउंडेशन मुक्ताईनगर तर्फे पारंबी विद्यालयास शालेय क्रीडा स्पर्धेसाठी विद्यार्थ्यांना टी-शर्ट सप्रेम भेट

शिवचरण उज्जैनकर फाउंडेशन मुक्ताईनगर तर्फे नवीन माध्यमिक विद्यालय पारंबी येथील शालेय क्रीडा स्पर्धेसाठी 17 विद्यार्थ्यांना टी-शर्ट सप्रेम भेट देण्यात आले हे टी-शर्ट फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष डॉ.शिवचरण उज्जैनकर यांनी नवीन माध्यमिक विद्यालय पारंबीचे मुख्याध्यापक श्री एस. बी. पाटील यांना नुकतेच सुपूर्त केले याप्रसंगी विद्यार्थ्यांनी हे टी-शर्ट परिधान करून आनंद व्यक्त केला दरवर्षी विविध शालेय स्पर्धांचे आयोजन करण्यात येते त्यावेळेस हे टी-शर्ट क्रीडा स्पर्धेत सहभागी विद्यार्थ्यांना दिले जातील याप्रसंगी मुख्याध्यापक श्री एस. बी. पाटील यांनी ज्येष्ठ शिक्षक तथा उज्जैनकर फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष डॉ. शिवचरण उज्जैनकर यांचा गुलाब बुके देऊन सत्कार केला. याप्रसंगी शिक्षक आर. पी. राठोड, एस. के. पाटील शिक्षकेतर कर्मचारी विनायक इंगळे, रघुनाथ इंगळे व टी-शर्ट प्ररिधान केलेले विद्यार्थी उपस्थित होते. डॉ. उज्जैनकर हे गेल्या 26 वर्षापासून कुऱ्हे विभाग एज्युकेशन सोसायटी संचलित नवीन माध्यमिक विद्यालय, पारंबी येथे अध्यापनाचे काम करत आलेले आहेत तसेच त्यांनी उज्जैनकर फाउंडेशनच्या माध्यमातून शैक्षणिक ,सामाजिक, साहित्यिक, कला, आरोग्य, कृषी व पर्यावरण क्षेत्रात नेत्र दीपक कार्य केलेले आहे जळगाव जिल्ह्यातील तसेच विविध जिल्ह्यातील हजारच्या वर शिक्षकांना तापी पूर्णा राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्काराने गौरवलेले आहे तसेच मुक्ताईनगर तालुक्यातील इयत्ता दहावी आणि बारावीच्या गुणवंत विद्यार्थी सत्कार सोहळ्यात हजारच्या वर विद्यार्थ्यांना सुद्धा गौरवलेले आहेत महाराष्ट्रात व महाराष्ट्र बाहेर सुद्धा मराठी भाषा प्रचार व प्रसारासाठी राज्यस्तरीय शिव बाल, किशोर व युवा मराठी साहित्य संमेलन व अखिल भारतीय शिव मराठी साहित्य संमेलनाचे आयोजनहि ते करत आहेत त्यांचे मुक्ताईनगर ,फोंडा गोवा, पन्हाळा किल्ला जिल्हा कोल्हापूर खामगाव जिल्हा बुलढाणा आदी ठिकाणी मराठी साहित्य संमेलनाचे यशस्वी आयोजन केलेले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *