महाराष्ट्र राज्य जुनी पेंशन संघटनेच्या जळगाव जिल्हाध्यक्ष पदी डॉ कुणाल पवार यांची बिनविरोध निवड..
![]()
महाराष्ट्र राज्य जुनी पेंशन संघटनेच्या जळगाव जिल्हाध्यक्ष पदी डॉ कुणाल पवार यांची बिनविरोध निवड..

अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)
महाराष्ट्र राज्य जुनी पेंशन संघटनेच्या जळगाव जिल्हा पुनर्गठन कार्यक्रमातर्गत काल दि.17 सप्टेंबर 2023 रोजी माध्यमिक शिक्षक पतपेढी जळगाव येथे जळगाव जिल्ह्यातील सर्व 15 तालुक्यातील नवनियुक्त तालुकाध्यक्ष व जिल्हा प्रतिनिधींच्या बैठकीत जळगाव जिल्हा कार्यकारणी निवड प्रकियेत डॉ. कुणाल पवार यांची जळगाव जिल्हाध्यक्ष पदी बिनविरोध निवड करण्यात आली. उर्वरित जिल्हा कार्यकारणी विस्तार पुढील जिल्हा कार्यकारणी बैठकीत लवकरच करण्यात येणार आहे. जिल्हा निवड प्रक्रिया राज्य निरीक्षक म्हणून नेमण्यात आलेले श्री राहुल पवार नंदुरबार, यांच्या आणि संघटनेचे राज्यसंघटक श्री संजय सोनार, राज्य सोशल मीडिया प्रमुख श्री विनायक चौथे यांच्या उपस्थित पार पडली. तसेच आजच्या बैठकीत जळगाव जिल्हा महिला कार्यकारणीची ही निवडी करण्यात आली. महिला जिल्हाध्यक्ष पदी श्रीमती पल्लवी गरुड, यांची निवड करण्यात आली. तर महिला जिल्हा सरचिटणीस म्हणून सौ.सुनिता निलेश पाटील, महिला जिल्हा कार्याध्यक्ष पदी १)श्रीमती ज्योत्स्ना शिरसाट-केदारे, २)श्रीमती माधवी वाघ-गरुड या दोघांची, तर महिला जिल्हा कोषाध्यक्ष पदी श्रीमती प्रेमलता पाटील, महिला जिल्हा उपाध्यक्ष पदी- १)सौ.सुवर्णा कौतिक धनगर व २)कुलश्री गणेश गवळी ३) श्रीमती शुभांगी महालपुरे-चिंचोले, तसेच महिला जिल्हा आरोग्य विभाग प्रमुख पदी श्रीमती तुळसा दुधे, महिला जिल्हा सल्लागार पदी ऍड.मनीषा संदीप देशमुख यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. यावेळी व्यासपीठावर राज्य निरीक्षक श्री राहुल पवार, संजय सोनार, विनायक चौथे, माजी जिल्हाध्यक्ष श्री गोविंदा ठाकरे उपस्थित होते. माजी जिल्हाध्यक्ष यांचा यावेळी विशेष सत्कार जिल्हा व राज्य कार्यकरणी च्या वतीने करण्यात आला.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संघटनेचे श्री विपीन पाटील, श्री संदीप पाटील, श्री भास्कर वानखेडे पाटील, श्री दीपक गिरासे, मुजुबीर रेहमान, राकेश पाटील,विवेक पाटील, कल्पेश चौधरी, सुनील ढाके ,राहुल पाटील, किरण सनेर,कैलास घोलाने,विनोद पाटील,उमाकांत हिरे ,गिरीश महाजन,श्रीकांत कुलकर्णी,संतोष धनगर,सोपान पारधी,प्रफुल्ल पाटील, अनिल वराडे,मुकेश पाटील,कमलेश महाजन, सुनील पारधी, योगेश गांधेले ,नितीन माळी,दीपक कोंडे,अजय भालेराव,दिनेश शिर्के ,प्रशांत बाविस्कर, आदींनी मेहनत घेतली.
यावेळी संघटनेच्या वतीने जुनी पेंशन लढा अधिक तीव्र करण्याचा निर्धार यावेळी करण्यात आला आणि येणाऱ्या 1 ऑक्टोबर रोजी दिल्ली येथे होत असलेल्या राष्ट्रीय स्तरावरील ‘पेंशन शंखनाद रॅली’ मध्ये अधिकाधिक संख्येने जिल्ह्यातील कर्मचाऱ्यांना सहभागी करून घेण्याचे आवाहन जिल्हाध्यक्ष डॉ. कुणाल पवार यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन माजी जिल्हा सल्लागार श्री नाना पाटील यांनी केले तर आभार श्री सचिन देशमुख यांनी मानले.

