1 min read

गोदावरी करंडक राज्यस्तरीय भावगीत स्पर्धेत स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालयाचा डंका.

Loading

गोदावरी करंडक राज्यस्तरीय भावगीत स्पर्धेत स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालयाचा डंका.

जळगाव: के.सी.ई. सोसायटी संचलित स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालयाच्या इ. १२वी कला शाखेचा विद्यार्थी चि.समर्थ पुरुषोत्तम पाटील याने नुकत्याच पार पडलेल्या गोदावरी करंडक राज्यस्तरीय भावगीत स्पर्धेत सहभाग नोंदवून आपल्या कर्णमधुर स्वरांच्या जोरावर संपूर्ण राज्यातून तृतीय क्रमांक संपादित केला. त्याला सदर स्पर्धेच्या बक्षीस वितरण समारंभात स्मृतीचिन्ह, प्रमाणपत्र व रोख ७०१ रुपयांचे पारितोषिक देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले. सदर स्पर्धेचे आयोजन अखिल भारतीय गंधर्व महाविद्यालय मंडळ मिरज संलग्नित व गोदावरी फाउंडेशन, जळगाव संचलित गोदावरी संगीत महाविद्यालयाच्या वतीने दि.१७ सप्टेंबर २०२३रोजी करण्यात आले होते. समर्थ पाटील यास संगीत विभागाचे शिक्षक वृंद प्रा.देवेंद्र गुरव, प्रा.कपिल शिंगाणे प्रा.मयुरी हरीमकर यांनी मार्गदर्शन केले. तो ओरियन सी.बी.एस.ई. शाळेच्या संगीत शिक्षिका श्रीमती. सोनाली शिरसाळे यांचा सुपुत्र आहे. त्याच्या या यशाबद्दल आज कनिष्ठ महाविद्यालयाच्या उपप्राचार्य प्रा.श्रीमती के.जी.सपकाळे यांच्या शुभहस्ते, पर्यवेक्षक प्रा.आर.बी.ठाकरे, तिन्ही शाखांचे समन्वयक सौ. स्वाती बऱ्हाटे, श्री.उमेश पाटील, श्री.प्रसाद देसाई यांच्या प्रमुख उपस्थितीत पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन करण्यात आले. याप्रसंगी सर्व शिक्षक बंधू- भगिनी उपस्थित होते.
समर्थाच्या यशाने महाविद्यालयाच्या संगीत विभागाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवलेला आहे. त्याच्या या यशाबद्दल संस्थाध्यक्ष प्रज्ञावंत श्री.नंदकुमार बेंडाळे, प्राचार्य डॉ.एस.एन.भारंबे, संस्थेचे सांस्कृतिक समन्वयक श्री.शशिकांत वडोदकर व सर्व कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांनी विशेष अभिनंदन केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *