परिश्रम दिव्यांग मुला मुलींची निवासी शाळा पारोळा या शाळेला 100% अनुदान मिळणेसाठी आ.बच्चूभाऊ कडू यांना निवेदन
![]()


परिश्रम दिव्यांग मुला मुलींची निवासी शाळा पारोळा या शाळेला 100% अनुदान मिळणेसाठी आ.बच्चूभाऊ कडू यांना निवेदन
अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)
दिव्यांग कल्याण विभाग महाराष्ट्र शासनातर्फे “दिव्यांग कल्याण विभाग दिव्यांगांच्या दारी अभियान” जिल्हा परिषद जळगाव अंतर्गत मा ना.ओमप्रकाश उर्फ बच्चू भाऊं कडू यांची भेट अण्णासाहेब योगेश रघुनाथ महाजन सर अध्यक्ष – चामुंण्डा माता बहुउद्देशीय विकास परिसर धुळे संचलित परिश्रम दिव्यांग मुला मुलींची निवासी शाळा पारोळा जिल्हा जळगाव शाळेला 100% अनुदान मिळणेसाठी निवेदन,सविस्तर माहिती व फोटो, कागदपत्रे इ.देण्यात आली.यावर मा.बच्चू भाऊ यांनी सांगितले की 100% अनुदान मिळून देतो.अनुदान मिळणेबाबत निवेदन,फाईल बघून जमा केली.तसेच बच्चू भाऊ स्वतः विद्यार्थी जवळ येऊन त्यांची भेट घेतली. शाळेचे विशेष विद्यार्थी यांचे सोबत हितगुज केले यावेळी चि.प्रधान या मतिमंद विद्यार्थी याने बच्चू भाऊंना सुंदर असे ईतनी शक्ती भक्ती गीतं म्हणून दाखवले व बच्चू भाऊ यांनी सत्काराची शाल चि प्रधान ला भेट दिली.
यावेळी मनिष किसन जाधव मुख्याध्यापक, जगदीश सोनवणे सर विशेष शिक्षक, दिपक पानसे, कुणाल महाजन उपस्थित होते.

