समस्त नागरिकांनी पावसाळ्यात स्वच्छता ठेवा व विविध आजारापासून संरक्षण करा, आरोग्य विभागामार्फत आवाहन
![]()

समस्त नागरिकांना आरोग्य विभागामार्फत, अवाहन तथा नम्र विनंती करण्यात येते की,
सध्या पावसाळ्याचे दिवस सुरू आहेत, केव्हां केव्हा पाऊस नसतो तेव्हा उष्ण दमट असे संमिश्र वातावरण आहे, यामुळे अश्या वातावरणात हिवताप,डेंग्यु, चिनगुनिया, ईत्यादी किटकजन्य आजार डोकं वर काढतात,
सर्वांनी साथरोगाबाबत जागरुक रहावे. त्यासाठी… आपण सर्वानीच खालील गोष्टी आवश्यक कराव्यात.
दुषित पाणी पिल्याने होणारे जलजन्य आजाराबाबत.
जलजन्य आजार म्हणजे दूषित पिण्याच्या पाण्यापासुन होणारे आजार आहेत,
उदा. टाईफाईड, काविळ, गॅस्ट्रो… ईत्यादी….
हे आजार दुषित पाणी पिल्यामुळे होतात…. याकरीता पुढील उपाय योजना कराव्यात…
फिल्टर, जार, किंवा मेडीक्लोअर युक्त पाणी प्यावे,
शेवटी काहीच नाही जमले तर…. गाळून उकळून स्वच्छ पाणी प्यावे.
यामुळे पाण्यापासुन होणारे आजार होणार नाहीत.
:-: किटकजन्य आजाराविषयी :-:
🦟🦟🦟🦟🦟🦟🦟
डंक छोटा… धोका मोठा
🦟🦟🦟🦟🦟🦟🦟
सर्वात घातक व धोकादायक आजार हिवताप, डेंग्यु, चिकनगुनिया आहे.
हे आजार डास 🦟 चावल्यामुळे होतात, हे आजार जिवघेणे आहेत तेंव्हा सर्वांनी सावधगिरी बाळगावी..
डेंग्युचे 🦟 चिकूनगुणियाचे डास स्वच्छ पाण्यावर बसुन पाण्यामध्ये अंडी🍳 सोडतात आणि तीन दिवसांनी त्याची लारवा (चाटुअळी, डोक, चामडोक, जंतू ) तयार होते त्यानंतर कोष आणि पाचव्या दिवशी परीपुर्ण डास तयार होतो हा डास दिवसा चावल्यास डेंग्यु होण्याची शक्यता असते तसेच घाण पाण्यातील डास चावल्यास हिवताप होण्याची शक्यता असते.
हे होवु नये म्हणुन पुढीलप्रमाणे उपाययोजना करावीत….
१) सर्वांनी आप आपले घरी साठवुन ठेवलेले सांडण्याची सर्वच भांडी हि झाकुन ठेवावेत व फडक्याने घट्ट बांधून ठेवावे, म्हणजे पाण्यावर डास बसुन अंडी घालणार नाहीत.
२) आठवड्यातुन दोन वेळा पाणी साठे घासून,पुसून स्वच्छ धुवून वाळवावेत,
म्हणजेच… दर शनिवारी कोरडा दिवस पाळणे.
३) आपल्या घराभोवताली पडलेले जुने टायर, नारळ करवंटी, जुने बुट, प्लास्टिक ग्लास, फुटके कप, खराब टायर, भरण्या… कुंड्या, कुलर ची टाकी, ईत्यादी पावसाचे थोडे ही पाणी साठणार्या वस्तु… नष्ट करणे अथवा पावसाचे पाणी साचणार नाही अशा ठिकाणी झाकुन ठेवणे.


४) घराभोवती नाली असेल तर त्यामध्ये खराब ऑईल टाकावे यामुळे डास होणार नाहीत.
आपण सर्वांनीच “माझे कुटुंब माझी जबाबदारी” याची जाणीव ठेवुन नियमित स्वच्छता ठेवावी,
सर्वांनी फक्त पिण्याचे पाणी आणि सांडपाणी स्वच्छ ठेवले तर वरील आजार होणारच नाहीत.
तसेच डासापासुन बचावासाठी असणारे उपाय करावेत उदा:-
दारखिडक्यांना जाळ्या बसवुन घ्याव्यात, संडासाच्या एअर पाईपला वर जाळी बसवावी, मच्छरदाणी, कॉईल, विविध क्रिम, लिंबाच्या पानाचा धुर, ईत्यादी पासुन बचाव करावा.
वरील गोष्टी नाही केल्यास आपले वर्षभर कमाई केलेले पैसे, जे की दवाखान्यात दोन दिवसातच संपतील, आणि जिवाला धोका ही निर्माण होईल.
हे आपण स्वच्छता ठेवल्याने 100℅ टाळू शकतो.
आपल्या घराची आणि दारातील, परीसर, पडकेवाडे व नालीची स्वच्छता ठेवणे हि आपलीच जबाबदारी आहे…
आपले आरोग्य आपल्या हाती… आपणच रोखुया रोगाच्या साथी…!!
या घोषवाक्या प्रमाणेच..
आपण यापुर्वी कोरोना भयावह साथरोगामध्ये, आपण सर्वांनी जसे आरोग्य विभागास सहकार्य केले तसेच सहकार्य नेहमी करावे,
व नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेणे ज्याप्रमाणे प्रशासन किंवा आरोग्य विभागाची जबाबदारी असते,
त्यापेक्षाही,
तितकंच महत्वाचं, आपण आपल्या स्वतःची काळजी घेणे देखील गरजेचे आहे,
वरीलप्रमाणे दिलेल्या सर्व सुचनांचे पालन सर्वानी करावे, असे आमच्या आरोग्य विभागाकडून नम्र अवाहन करण्यात येते.
नागरिक बंधुनो, आपल्या सहकार्या शिवाय आरोग्य विभागाचे कुठलेही काम शक्य नाही,
तेंव्हा मनापासुन आरोग्य विभागास सहकार्य करावे, वेळोवेळी दिलेल्या सूचनांचे पालन करावे.
आपल्या दारात दररोज विविध योजना व इतर कामासाठी येणारे आरोग्य कर्मचारी आशा सेविका यांना सहकार्य करावे, व त्यांच्याकडून आरोग्यासाठीच्या विविध योजनाची माहिती देखील करुन घेवुन त्याचा पुरेपुर लाभ घ्यावा.
तेंव्हा सर्वांकडून सहकार्याची अपेक्षा आहे.
== जनहितार्थ ==
@ जिल्हा आरोग्य अधिकारी जि.प.जळगांव
@ जिल्हा हिवताप अधिकारी जळगाव
@ सर्व तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय

