अमळनेर तालुकास्तरीय विज्ञान नाट्य उत्सव स्पर्धा संपन्न
![]()


अमळनेर तालुकास्तरीय विज्ञान नाट्य उत्सव स्पर्धा संपन्न
आज दि.15 सप्टेंबर, रोजी अमळनेर येथील ग. स. हायस्कूल मध्ये नाट्य उत्सव स्पर्धा पार पडली. एकूण 10 माध्यमिक शाळांनी सहभाग नोंदवला. यात पी. बी. ए. इंग्लिश स्कूल च्या विद्यार्थ्यांनी प्रथम क्रमांक पटकावला. द्वितीय क्रमांक जय योगेश्वर विद्यालय, अमळनेर ने तर भरवस येथील श्रीराम गबाजीराव सोनवणे विद्यालय ने तृतीय क्रमांक मिळविला ,वावडे येथील बी. बी. ठाकरे विद्यालय ला उत्तेजनार्थ पारितोषिक देण्यात आले.नाट्य उत्सवासाठी शिक्षण विभाग, पं.स.अमळनेर चे गटशिक्षणाधिकारी मा. रावसाहेब पाटील साहेब यांचे प्रमुख मार्गदर्शन लाभले.अध्यक्षस्थानी जेष्ठ शिक्षणविस्तार अधिकारी पी. डी. धनगर ,सोबतच केंद्रप्रमुख भगवान पाटील,विषय सहाय्यक किशोर पाटील हे होते.परीक्षक म्हणून जगदीश पाटील , भाग्यश्री वानखेडे यांनी काम पाहिले सुत्रसंचलन नेहा पाटील यांनी तर आभार वानखेडे मॅडम यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी ग.स. हायस्कूल चे मुख्याध्यापक बी. एस. पाटील सर,विज्ञान मंडळाचे अध्यक्ष निरंजन पेंढारे ,एस. टी. सोनवणे, प्रमिला अडकमोल, राजश्री पाटील,स्वाती माळी, संदीप गोसावी यांचे सहकार्य लाभले.

