1 min read

अभियंता दिवसानिमित्त नेत्र तपासणी

Loading

अभियंता दिवसानिमित्त नेत्र तपासणी
अमळनेर येथील श्रीमती इंदिरा गांधी विद्या मंदिर शाळेत 15 सप्टेंबर2023 रोजी आधार बहुउद्देशीय संस्था व विप्रो कंपनी यांच्या संयुक्त विद्यमाने इयत्ता पाचवी ते सातवीच्या शालेय विद्यार्थ्यांची नेत्र तपासणी करण्यात आली. 15 सप्टेंबर हा दिवस महान अभियंता भारतरत्न डॉ.मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांच्या जयंतीनिमित्त अभियंता दिवस म्हणून 1968 पासून साजरा करण्यात येतो. त्यानिमित्ताने आज नेत्र तपासणीचे आयोजन करण्यात आले होते. सदर प्रसंगी नेत्र तपासणीसाठी अभिनव मुंदडा यांनी सहकार्य केले. त्यांना प्रकल्प समन्वयक म्हणून निशिगंधा पाटील, दीपक विश्वेश्वर, अनुजा पाटील यांनी सहकार्य केले. सदरचा कार्यक्रम संचालिका- रेणू प्रसाद, वेल फेअर ऑफिसर -सुधीर बडगुजर, अध्यक्षा- भारती पाटील, अश्विनी भदाणे यांच्या प्रेरणेने घेण्यात आला. सदर कार्यक्रमासाठी महात्मा गांधी शिक्षण प्रसारक मंडळ व मुंदडा फाउंडेशनचे विद्यमान अध्यक्ष प्रकाश भाऊ मुंदडा, चिटणीस राजूभाऊ मुंदडा, सहचिटणीस योगेश भाऊ मुंदडा व कार्यकारणी संचालक व संचालिका यांचे मार्गदर्शन घेण्यात आले. संबंधित शालेय विद्यार्थ्यांची नेत्र तपासणीसाठी शिक्षक पी.एम.ठाकरे ,व्ही.डी.पाटील, ए.पी. जाधव ,पी.ए.शेलकर,डी. एस. कारले यांनी सहकार्य केले. उपक्रमशील शिक्षक डी. ए.सोनवणे यांनी आपल्या डोळ्यांचे आरोग्य आपण कशा पद्धतीने सुदृढ ठेवले पाहिजे यासाठी वाचन, लेखन, मनन करताना डोळ्यांवर येणारे ताणतणाव कसे नष्ट केले जातील याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले. नेत्र तपासणीत जे विद्यार्थी योग्य अंतरावरून वाचन करताना दृष्टी दोष आढळून आले अशा विद्यार्थ्यांना मोफत चष्मा वाटप करण्यात येणार आहे.असे महात्मा शिक्षण प्रसारक मंडळाचे चिटणीस श्री राजूभाऊ मुंदडा यांनी सुचित केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *