1 min read

सेंट टेरेसा शाळेत फॅन्सी ड्रेस स्पर्धा संपन्न

Loading

सेंट टेरेसा शाळेत फॅन्सी ड्रेस स्पर्धा संपन्न

गणेश हिरवे
मुंबई प्रतिनिधी

वांद्रे पश्चिम येथील सेंट टेरेसा शाळेत नुकतीच इयत्ता चौथी च्या विद्यार्थ्यांसाठी फॅन्सी ड्रेस स्पर्धा (वेशभूषा स्पर्धा) उत्साहात संपन्न झाली. या मुलांना परिकथांमधील जादुई पात्र ड्रेस परिधान करून येण्याची थीम देण्यात आली होती आणि त्यानुसार अनेक मुलांनी सिंड्रेला, रॉबिनहूड, अल्लादिन, स्नो व्हाईट चा राजकुमार आणि परी, जादूगार तसेच इतर अनेक पात्र खूप छान तयार केली होती. प्रथम क्रमांक मोहम्मद चौधरी, द्वितीय क्रमांक रिधान शेडगे, तृतीय विभागून विहान पवार व मोहम्मद अरहम शेख तर उत्तेजनार्थ म्हणून उझेर शेख, मोहम्मद अर्श शोएब कुरेशी, ईमाद झाकी माहिमी यांनी पारितोषिके पटकाविली.
या शाळेत मुलांच्या कला गुणांना वाव मिळावा, त्यांना आपले कलागुण सादर करता यावेत म्हणून सर्वच शिक्षकवर्ग मुख्याध्यापक फादर निकी यांच्या मार्गदर्शनाखाली विविध स्पर्धा आणि वेळोवेळी विशेष प्रार्थना सभेचे आयोजन करीत असतात.यावेळी शाळेतील पर्ल डिसोझा आणि अस्संशन रॉड्रिग्ज या मान्यवर टीचर्स नी जजेस म्हणून काम पाहिले, तर फादर निकी आणि फादर शेनोय प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
एकंदरच स्पर्धा खूप छान रंगली, प्रत्येक स्पर्धकाने त्याच्या पात्राला जिवंत करण्याचा, त्याला न्याय देण्याचा पुरेपूर प्रयत्न केला व पात्र साकारताना मुलांनी जी मेहनत घेतली होती ती स्टेजवर दिसून येत होती.पात्र तयार करण्यासाठी इयत्ता चौथीच्या ए बी सी डी क्लास टीचर आणि स्पर्धक मुलांचे पालक यांनी खूप मेहनत घेतली.भविष्यात शाळेतील अनेक मुलांकडून अशीच प्रगती होत राहील असा विश्वास यावेळी उपस्थितांनी व्यक्त केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *