सिंचन भवनजवळील लीक पाईपलाईनची दखल,धुळे महानगरपालिका कारभाऱ्यांचे जाहीर आभार
![]()

सिंचन भवनजवळील लीक पाईपलाईनची दखल,धुळे महानगरपालिका कारभाऱ्यांचे जाहीर आभार
धुळे- येथील साक्री रोडवरील सिंचनभवन लगत वेळोवेळी पाईप लाईन लीक होऊन शेकडो लिटर पाणी वाया जात होते. त्या संदर्भात वृत्तपत्र व समाज माध्यमावर ‘सिंचनभवन जवळ अवतरलेल्या जलधारांनी विद्यावर्धिनी लगतचा हगऱ्या नाला भरून घ्यावा’’ अशा आशयाचे उपरोधीक वृत्त झळकले होते. या वृत्ताची तातडीने दखल घेत महानगरपालिकेच्या कारभाऱ्यांच्या आदेशानुसार आज सकाळपासून जेसीबीच्या सहाय्याने खोदकाम करून पाईपलाईन लीक दुरुस्तीच्या दिशेने सुरुवात केली असून ही पाईपलाईन पुन्हा लीक न होता कायमस्वरुपी दुरुस्त होईल अशी माफक अपेक्षा व्यक्त करून ज्येष्ठ पत्रकार गो.पि. लांडगे यांनी महापालिकेच्या दखलपात्र जागरुक कारभाऱ्यांचे ‘जरतारी’ आभार मानले आहेत.

