1 min read

सायबर कॉलेज मध्ये अवयवदान जनजागृतीपर व्याख्यानाचे आयोजन

Loading

सायबर कॉलेज मध्ये अवयवदान जनजागृतीपर व्याख्यानाचे आयोजन

वार्ताहर (नवी मुंबई) सुभाष हांडे देशमुख:

कोल्हापूर: सायबर कॉलेज कोल्हापूर मध्ये गुरुवार दि. १४/ ०९/ २०२३ रोजी द फेडरेशन ऑफ ऑर्गन अँड बाँडी डोनेशन, सायबर कॉलेज व्यवस्थापन व राज्य गुणवंत कामगार असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने, एम. एस. डब्ल्यू. च्या प्रथम व द्वितीय वर्षातील विद्यार्थ्यांसाठी अवयवदान जनजागृती अभियान अंतर्गत प्रबोधनात्मक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी एम. एस. डब्ल्यु. विभागाचे प्रमुख डॉ. डी. एम. भोसले यांच्या हस्ते द ऑर्गन अँड बॉडी डोनेशनचे कोल्हापूर जिल्हा प्रमुख योगेश अग्रवाल, राज्य गुणवंत कामगार संघटनेचे अध्यक्ष सुरेश केसरकर आणि यशोदर्शन फाउंडेशनच्या पदाधिकारी रेखा बिरांजे यांचा तुळशीचे रोप देवून सत्कार करण्यात आला. यशोदर्शन फाउंडेशनच्यावतीने योगेश अग्रवाल यांनी अवयवदान व देहदान या विषयांवर उपस्थित सर्व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. त्यांच्या व्याख्यानाच्या अनुषंगाने अनेक विद्यार्थ्यांनी अवयवदान व देहदान करणेचा संकल्प केला. याप्रसंगी एम. एस. डब्ल्यु. विभागाचे लेक्चरर् आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी यशोदर्शन फाउंडेशनच्या वतीने संकल्प केलेल्या सर्वांना डोनर कार्ड प्रदान करणेत आले. असे आमच्या प्रतिनिधीशी बोलताना असोसिएशनचे अध्यक्ष सुरेश केसरकर यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *