1 min read

उपक्रमशील शिक्षक किशोर पाटील यांनी आपला वाढदिवस दिव्यांग केंद्र मेहरून परिसर येथे केला साजरा…

Loading

शासकीय दिव्यांग केंद्र मेहरून परिसर येथे किशोर पाटील वाढदिवस साजरा

आज दिनांक 14 सप्टेंबर23 वार गुरुवारी सकाळी 11 वा शासकीय दिव्यांग केंद्र जळगाव येथे श्री किशोर पाटील सर यांचा वाढदिवस सर्व मूकबधिर अंध अपंग कर्णबधिर मुलांसोबत सर्व मित्र परिवार संमिश्र केंद्रातील कर्मचारी संघर्ष दिव्यांग बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष गणेश पाटील उपाध्यक्ष जितेंद्र पाटील काळजीवाहक राजेंद्र ठाकूर वासुदेव वाघ सोमनाथ पाटील शिक्षक भारती अध्यक्ष अजय पाटील शिक्षक भारती परिवार अक्षय महाजन सर हिम्मतराव पवार किशोर नेवे आदी मान्यवरांच्या उपस्थितीत मोठ्या थाटात श्री किशोर पाटील सर यांचे वडील पंढरीनाथ हरचंद पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली उत्साहात साजरा करण्यात आला याप्रसंगी श्री सोमनाथ पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त केले सर्व विद्यार्थ्यांना वाढदिवसानिमित्त तसेच पोळा सणाच्या निमित्ताने वरण बट्टी वांग्याची भाजी व मावा बर्फी चे गोड भोजन देण्यात आले मान्यवरांसमवेत केक कापून श्री किशोर पाटील सरांचा वाढदिवस सर्व विद्यार्थ्यांचे साक्षीने थाटामाटात साजरा करण्यात आला प्रसंगी सर्व मित्र परिवार व स्नेही जन यांनी किशोर पाटील सरांच्या या नवीन उपक्रमाचे भरभरून कौतुक केले व भविष्यातही त्यांच्या हातून असेच सामाजिक शैक्षणिक कार्य घडत राहो अशी सदिच्छा दिली. संघर्ष दिव्यांग बहुउद्देशीय संस्थेचे उपाध्यक्ष श्री जितेंद्र पाटील यांनी आठवण म्हणून एक काचेची कलाकृती सप्रेम भेट म्हणून दिली सर्व विद्यार्थ्यांना केक व चॉकलेटचे वाटप पाटील परिवाराकडून करण्यात आले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *