हिंदी दिवस देशभर उत्साहाने साजरा.
![]()


हिंदी दिवस देशभर उत्साहाने साजरा.
मुंबई (विशेष प्रतिनिधी)
१४ सप्टेंबर १९४९ रोजी घटना समितीने भारतीय
संघराज्याच्या राजभाषेत ऐतिहासिक निर्णय घेऊन हिंदी भाषेला राजभाषेचा सन्मान दिला. त्यामुळे दरवर्षी १४ सप्टेंबर हा दिवस ‘ हिंदी दिन’ म्हणून साजरा केला जातो.
हिंदी ही भारत देशामधील सर्वाधिक वापरली व बोलली जाणारी भाषा आहे. हिंद-आर्य भाषासमूहामधील हिंदुस्तानी भाषेच्या संस्कृतीकरणामधून हिंदीचा उदय झाला. भारताच्या उत्तर भागातील आणि मध्य प्रदेशातील लोकांची ती मातृभाषा आहे.आज देशात ठिक – ठिकाणी हिंदी दिवस साजरा केला जातो.
हिंदी दिवसाच्या निमित्ताने वत्कृत्व स्पर्धा, काव्य वाचन, कथालेखन, एकपात्री अभिनय अशा विविध प्रकारच्या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते.
वालिया कनिष्ठ महाविद्यालय , राजहंस विद्यालय, हंसराज मोरारजी पब्लिक स्कूल अंधेरी येथील शाळा, महाविद्यालयात हिंदी दिवसाचे औचित्य साधून विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. वालिया काँलेज मधील हिंदी विषयाच्या प्राध्यापिका श्रीमती नीलम द्विवेदी यांनी हिंदी विभाग प्रमुख प्रणिती सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली हिंदी दिवसाचे उत्कृष्ट आयोजन केले वालिया काँलेजच्या उपप्राचार्या श्रीमती सपना राजमोहन यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे बक्षीस देऊन अभिनंदन केले. हंसराज मोरारजी पब्लिक स्कूलचे कला शिक्षक अभय ठाकरे यांनी सुंदर असे फलक लेखन केले. राजहंस विद्यालयातील विद्यार्थ्यांनी हिंदी दिवसाच्या निमित्ताने अनेक साहित्यिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले होते.
प्राध्यापक धर्मेंद्र द्विवेदी व श्रीमती नीलिम द्विवेदी हे दांपत्य कनिष्ठ महाविद्यालयात हिंदी विषयाचे प्राध्यापक आहेत. हिंदी ही देशात बोलली जाणारी मोठी भाषा आहे याचा आम्ही हिंदी भाषिक म्हणून आम्हाला अभिमान आहे तसेच ज्या महाराष्ट्र राज्याने आमच्या वर संस्कार केले, आम्हाला घडवले व आमचे पालनपोषण केले ती राज्याची मराठी भाषा मराठी व आमचे एक अतुट नाते आहे. या मराठी भाषेला राज्य भाषा व हिंदी भाषेला लवकरात लवकर राष्ट्र भाषेचा दर्जा प्राप्त व्हावा
अशी अपेक्षा आमच्या प्रतिनिधीकडे व्यक्त केली. ग्रंथपाल आरती शर्मा यांनी ग्रंथालयात हिंदी साहित्याची जणू मेजवानीच प्रदर्शित केली होती. शाळेचे मुख्याध्यापक श्री गोविंदराजन श्रीनिवासन सरांनी हिंदी भाषेचे महत्त्व विशद केले.

