1 min read

डोंबिवली येथील के.एम.पटेल महाविद्यालयाच्या एनएसएस छात्रसैनिकांनी श्रमदानाने केले खड्डे बुजवण्याचे कार्य.. मातोश्री काशी बेन पटेल महाविद्यालयाच्या एनएसएस युनिटचा आदर्श सर्वांनी घ्यावा:: सुमित चौधरी.

Loading

डोंबिवली येथील के.एम.पटेल महाविद्यालयाच्या एनएसएस छात्रसैनिकांनी श्रमदानाने केले खड्डे बुजवण्याचे कार्य.. मातोश्री काशी बेन पटेल महाविद्यालयाच्या एनएसएस युनिटचा आदर्श सर्वांनी घ्यावा:: सुमित चौधरी.

ठाणे:कल्याण ( मनिलाल शिंपी)श्री. डोंबिवली मित्र मंडळ संचालित मातृश्री काशीबेन मोतीलाल पटेल वरिष्ठ महाविद्यालय वाणिज्य आणि विज्ञान ठाकुर्ली पूर्व एन एस एस युनिटने २०२३-२४ मध्ये घेण्यात येणाऱ्या रस्ता दुरुस्ती कार्यक्रमात रस्त्यामध्ये होणाऱ्या खड्ड्यांमुळे नागरिकांना होणाऱ्या त्रासावर निवारण काढण्यासाठी मातृश्री काशीबेन मोतीलाल पटेल वरिष्ठ महाविद्यालय वाणिज्य आणि विज्ञान च्या एनएसएस युनिटने उपाय शोधला. एन एस एस युनिटच्या एकूण 32 स्वयंसेवकांनी ठाकुर्ली येथील सारसस्वत कॉलनीच्या रस्त्यावरील खड्डे बुजवणीचे काम हाती घेतले, याप्रकारे आम्ही समाजाला मदत केली आहे. त्याबद्दल ठाकुर्लीतील आसपासच्या रहिवाशांनी रस्त्यावर येजा करण्याऱ्यांनी राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकांचे तसेच महाविद्यालयाचे मनापासून आभार व्यक्त केले तसेच समाजसेवक सुमित चौधरी यांनी खडीची व्यवस्था करून मोलाचे सहकार्य केले. परिसरातील नागरिकांनी देखील खडी भरण्यासाठी हात गाडीची मदत देखील केली. या परिसरातून ये जा करणाऱ्या गाड्यांना कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये किंवा प्रवाशांना ,वृद्ध व्यक्तीं, अपंग व्यक्ती, महिला, यांना होणारा त्रास पाहून, याच विभागातील समाजसेवक सुमित चौधरी यांचा सहकार्याने रस्त्यावरील खड्डे भरण्याचे कार्य श्रमदानाने के.एम. पटेल महाविद्यालयाच्या एनएसएस युनिटच्या स्वयंसेवकांनी हाती घेतले. कोणत्याही पुरस्काराची अपेक्षा न बाळगता ही मुलं समाजाच्या हितासाठी नेहमी झटत असतात. छात्र सैनिकांनी केलेल्या सेवाकार्याची माहिती ऐकून सर्वत्र एन एस एस चा या युनिट चे अभिनंदन आणि कौतुक करण्यात येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *