1 min read

मराठी पत्रकार परिषदेचे कोषाध्यक्ष विजय जोशी यांना पत्रकारिता क्षेत्रासाठीचा जीवनगौरव पुरस्कार जाहिर

Loading

मराठी पत्रकार परिषदेचे कोषाध्यक्ष विजय जोशी यांना पत्रकारिता क्षेत्रासाठीचा जीवनगौरव पुरस्कार जाहिर

नांदेड- येथील स्व. गंगाधररावजी पांपटवार जयंती महोत्सव समिती, टिचर्स क्लब रुग्णालय व स्व. गंगाधररावजी पांपटवार आरोग्य क्षेत्रातील अग्रगण्य वैद्यकीय सहकारी संस्थेच्या पाचव्या वर्धापन दिनाच्या औचित्याने शिक्षण, वैद्यकीय साहित्य, समाजसेवा, उद्योग, पत्रकारिता, कला, लेखन, प्रकाशन या प्रकारातील मान्यवरांना जीवनगौरव पुरस्कार घोषित करण्यात आले असून पत्रकारिता क्षेत्रातील मानाचा जीवनगौरव पुरस्कार मराठी पत्रकार परिषदेचे कोषाध्यक्ष व दैनिक ‘सामना’ चे जिल्हा प्रतिनिधी विजय जोशी यांना जाहीर झाला असून शुक्रवार दि. 15 सप्टेंबर रोजी दुपारी 1 वाजता नांदेड येथील कुसुम सभागृहात प्रमुख अतिथी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तथा माजी मंत्री जयंतराव पाटील, माजी खासदार भास्करराव पाटील खतगावकर, आमदार बालाजी कल्याणकर, माजी मंत्री माधवराव पाटील किनाळकर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजकुमार मुक्कावार, उद्योग मंत्रालयाचे ओ.एस.डी. प्रशांत रुमाले, प्रमुख वक्ते डॉ. श्रीपाद भालचंद्र जोशी आदी नेते साहित्यिक विचारवंत यांच्या प्रमुख उपस्थितीत अन्य पुरस्कारार्थी सोबतच विजय जोशी यांना प्रदान करण्यात येणार आहे. या कार्यक्रमास उपस्थितीचे आवाहन संस्थेचे गजानन पांपटवार, सचिव सौ. अंजली पांपटवार,संचालक प्रा. डी.बी. जांभरुणकर आदींनी केले आहे. महात्मा गांधी मिशनचे संचालक अंकुशराव कदम, ज्येष्ठ पत्रकार ‘सामना’चे जिल्हा प्रतिनिधी विजय जोशी यांचे सर्वत्र अभिनंदन होत असून मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस.एम.देशमुख, विश्वस्त किरण नाईक, अध्यक्ष शरद पाबळे, कार्याध्यक्ष मिलींद आष्टीवकर, सरचिटणीस हाजी मन्सुरभाई शेख आदींसह परिषदेच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांचे अभिनंदन केले.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *