अमळनेरला मराठा समाजातील 10 वी ,12 वी तसेच विविध क्षेत्रात प्राविण्य मिळवलेल्या गुणवंतांचा १७ सप्टेंबरला सत्काराचे आयोजन..
![]()
अमळनेरला मराठा समाजातील 10 वी ,12 वी तसेच विविध क्षेत्रात प्राविण्य मिळवलेल्या गुणवंतांचा १७ सप्टेंबरला सत्काराचे आयोजन..

अमळनेर प्रतिनिधी
मराठा समाजातील 10 वी ,12 वी तसेच विविध क्षेत्रात प्राविण्य मिळवलेल्या गुणवंतांचा सत्कार ,तसेच अमळनेरचे प्रथम मंत्री ना. भूमिपुत्र अनिलदादा यांचा सत्कार , तसेच विविध संस्थांमध्ये निवडून आलेल्या पदाधिकाऱ्यांचा सत्कार दि १७/९/२०२३ रोजी रविवारी सकाळी १० वाजता कै सुंदरबाई दिनकरराव देशमुख मराठा मंगल कार्यालयात आयोजित करण्यात आला आहे. यावेळी अल्पोपहार देखील ठेवण्यात आला आहे. आपण सर्वांनी या कार्यक्रमास उपस्थित रहावे ही नम्र विनंती तसेच मराठा समाजातील गुणवन्त ,प्राविण्य मिळवलेल्या विद्यार्थी व व्यक्तींची नावे कार्यालयात पाठवावीत जेणेकरून त्यांचा सत्कार करता येईल… आपले विनीत ,अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचीव व सदस्य मराठा समाज ,अमळनेर यांनी कळविले आहे.

