1 min read

स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालय, एम.जे.(स्वायत्त) कॉलेज जळगाव येथे भूगोल विभागातर्फे ‘भूगोल विषयात करियर संधी’ यावर व्याख्यान आयोजित.

Loading

स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालय, एम.जे.(स्वायत्त) कॉलेज जळगाव येथे भूगोल विभागातर्फे ‘भूगोल विषयात करियर संधी’ यावर व्याख्यान आयोजित.

जळगाव:येथील स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालय (एम.जे. स्वायत्त कॉलेज) जळगाव येथे भूगोल विभागातर्फे ‘भूगोल विषयात करियर संधी’ यावर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. यावेळी प्रा.डॉ.चेतन महाजन हे प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला त्यांचे पुष्पगुच्छ व भेटवस्तू देऊन स्वागत करण्यात आले.
यावेळी प्रा.डॉ.चेतन महाजन यांनी विद्यार्थ्यांना भूगोल विषयाची ओळख व माहिती विस्तृतपणे विषद करून भूगोल हा विषय अत्यंत व्यापक असून यात अनेक विषयांचा अंतर्भाव व सहसंबंध त्याची खोली वाढवतो असे प्रतिपादीत केले. भूगोल या विषयात वेगवेगळ्या क्षेत्रात वैशिष्ट्यपूर्ण महत्त्व असून अद्ययावत अशा करियरच्या संधी उपलब्ध आहेत. यात जीओ इन्फार्मेटिक्स, जीआयएस, रिमोट सेन्सींग, सर्व्हेअर, टूरिझम या प्रमुख क्षेत्रात करियरची बहुविध दालने खुली असून यात करिअरच्या नानाविध संधी उपलब्ध असल्याचे सांगत विद्यार्थ्यांच्या शंकांना समर्पक उत्तरे देत यथार्थ मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी महाविद्यालयाच्या उपप्राचार्या प्रा. करुणा सपकाळे तर तिन्ही विद्याशाखांचे समन्वयक प्रा.स्वाती ब-हाटे, प्रा.उमेश पाटील, प्रा.प्रसाद देसाई उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व प्रमुख पाहुण्यांचा परिचय भूगोल विषय इन्चार्ज प्रा. उमेश पाटील, सूत्रसंचालन प्रा.दिपक चौधरी तर आभारप्रदर्शन प्रा.उमेश ठाकरे यांनी केले. यावेळी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रा.अर्जुन मेटे, प्रा.जयंत इंगळे, प्रा. गणेश सूर्यवंशी, प्रा.डी. एच.कोळी यांनी परिश्रम घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *