1 min read

अखिल भारतीय माळी महासंघातर्फे दि.१७ सप्टेंबरला जैताणे येथे साक्री तालुक्यातील माळी समाजाच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव; उपस्थितीचे आवाहन!

Loading

अखिल भारतीय माळी महासंघातर्फे दि.१७ सप्टेंबरला जैताणे येथे साक्री तालुक्यातील माळी समाजाच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव; उपस्थितीचे आवाहन!

(प्रा.भगवान जगदाळे)
धुळे : अखिल भारतीय माळी महासंघातर्फे साक्री तालुक्यातील माळी समाजाच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव पालकांसह रविवार, दि.१७ सप्टेंबर २०२३ रोजी जैताणे (ता.साक्री) येथील माळी समाज मंगल कार्यालयात सकाळी १०:०० वाजता राष्ट्रीय अध्यक्ष मा.विलासराव पाटील सर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न होणार आहे.

मानद अध्यक्ष ऍड.संभाजीराव पगारे, संस्थापक विश्वस्त मा.डी.के.माळी, महिला आघाडीच्या राष्ट्रीय अध्यक्षा मा.सौ.तारकाताई विवरेकर, महिला आघाडीच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षा मा.सौ.इंदिराताई अहिरे, नाशिक विभागीय अध्यक्ष मा.वासुदेव देवरे, धुळे जिल्हाध्यक्ष मा.आर.के.माळी यांच्यासह मान्यवरांची प्रमुख उपस्थिती असेल. या सेवाभावी समाजकार्यासाठी तनमनधनाने मदत आणि सहकार्य करणाऱ्या दात्यांसह तालुक्यातील माळी समाजाचे विद्यमान सरपंच, उपसरपंच, पंचायत समिती सदस्य, जिल्हा परिषद सदस्य, MPSC, UPSC, PhD., NET/SET उत्तीर्ण तसेच शासकीय/निमशासकीय सेवेत विविध पदांवर निवड झालेल्या कर्तृत्ववानांचाही जाहीर सत्कार होणार आहे.

गुणवंत विद्यार्थ्यांना माळी महासंघातर्फे आकर्षक प्रमाणपत्रे व फोल्डर/फाईल भेट म्हणून दिले जाणार आहेत. तरी १० वीत ८५% व त्यापुढे, १२ वीत ८०% व त्यापुढे, पदवी, पदव्युत्तर, पदविका परीक्षेत ७५% व त्यापुढील गुण मिळविणाऱ्या सर्वांनीच आपली नावे व गुणपत्रिकांच्या झेरॉक्स प्रती दि.१६ सप्टेंबरपर्यंत प्रा.दिनेश माळी, साक्री (9421534386), प्रा.भगवान जगदाळे, निजामपूर-जैताणे (9860076117), पत्रकार सुभाष जगताप, पिंपळनेर (9423289603), पत्रकार राजेंद्र गवळी, पिंपळनेर (8275789602), धनंजय घरटे सर, सामोडे (9423919296), भारत सायबर, शिवाजी रोड, जैताणे (8407951911), रामदास माळी, दहिवेल (9158413213), विजय पगारे सर, देशशिरवाडे (8286272419), जय भवानी ट्रेडर्स, साक्री (94039 04682), सिद्धेश्वर मेडिकल, पिंपळनेर (84540 00137) यांच्याकडे त्वरित जमा करावेत, असे आवाहन अखिल भारतीय माळी महासंघाच्या पिंपळनेर व साक्री तालुका कार्यकारिणीतर्फे करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *