1 min read

हिंदी अध्यापक मंडळाच्या वतीने गटशिक्षणाधिकारी रावसाहेब पाटील यांचा सत्कार…

Loading

हिंदी अध्यापक मंडळाच्या वतीने गटशिक्षणाधिकारी रावसाहेब पाटील यांचा सत्कार…

14 सप्टेंबर हिंदी दिनानिमित्ताने सामान्य ज्ञान परीक्षा घेण्याबाबत झाली चर्चा..

अमळनेर प्रतिनिधी- हिंदी अध्यापक मंडळ अमळनेर शाखाच्या वतीने नुकताच नूतन गटशिक्षणाधिकारी तथा ग.स.संचालक रावसाहेब मांगो पाटील यांचा सत्कार करण्यात आला.
गटशिक्षणाधिकारी रावसाहेब पाटील यांच्याशी हिंदी अध्यापक मंडळाचे अध्यक्ष आशिष शिंदे व सचिव दिलीप पाटील,उपाध्यक्ष ज्ञानेश्वर ईनशुलकर,खजीनदार राजेंद्र पाटील, मा.अध्यक्ष दिपक पवार, जिल्हा सदस्य एन.आर.चौधरी, प्रसिद्धी प्रमुख ईश्वर महाजन यांनी 14 सितंबर हिंदी दिनानिमित्ताने तालुकास्तरीय सामान्य ज्ञान परीक्षा घेण्याच्या संदर्भात चर्चा केली.
तेव्हा गटशिक्षणाधिकारी रावसाहेब पाटील म्हणाले की आपण आपल्या हिंदी मंडळाच्या माध्यमातून प्रत्येक शाळेतून हिंदी शिक्षकांच्या माध्यमातून परीक्षा घ्यावी असे सांगितले. आतापर्यंत हिंदी अध्यापक मंडळ अमळनेर शाखाच्या वतीने 13 वर्षापासून विविध स्पर्धेचे आयोजन 14 सप्टेंबर हिंदी दिनानिमित्ताने केले जात आहे.. हिंदी अध्यापक मंडळ नेहमीच विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेला वाव देत हिंदी भाषेचा प्रचार प्रसारासाठी कटिबद्ध आहे असे अध्यापक मंडळाचे अध्यक्ष आशिष शिंदे यांनी सांगितले. यावेळी हिंदी अध्यापक मंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *