1 min read

प्रात्यक्षिक ज्ञानाशिवाय भौतिकशास्त्र शिकणे अवघड-प्रा.दिलीप भारंबे.

Loading

प्रात्यक्षिक ज्ञानाशिवाय भौतिकशास्त्र शिकणे अवघड-प्रा.दिलीप भारंबे.

जळगांव: येथील के.सी.ई. सोसायटी संचलित स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालयात भौतिकशास्त्र विभागाद्वारे विद्यार्थ्यांची भौतिकशास्त्र विषयाची अनामिक भीती दूर करण्यासाठी नुकतेच मराठी विज्ञान परिषद जळगावचे सचिव प्रा.श्री.दिलीप भारंबे यांच्या मार्गदर्शन वर्गाचे आयोजन करण्यात आले होते. यात त्यांनी भौतिकशास्त्रातील इ.११ वी,१२वी स्तरावरील असंख्य वैज्ञानिक प्रयोग सादर करीत विद्यार्थ्यांचे कुतूहल वाढवत त्यांची भौतिकशास्त्राबद्दलची भीती किती अनाठायी आहे हे विषद करतांना अध्ययनातील प्रात्यक्षिक कार्याचे महत्त्व अधोरेखित केले. या कार्यक्रमाच्या सुरुवातीला प्रा.श्री.भारंबे सरांचा पर्यवेक्षक प्रा.श्री. आर.बी.ठाकरे यांच्या शुभहस्ते पुष्पगुच्छ देऊन यथोचित सन्मान करण्यात आला. याप्रसंगी पर्यवेक्षक प्रा.श्री.आर.बी.ठाकरे, विज्ञान शाखेच्या समन्वयिका प्रा.सौ.स्वाती बऱ्हाटे उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन प्रा.श्रीमती. शीतल काळे यांनी केले. याप्रसंगी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी भौतिकशास्त्र विषयाच्या सर्व शिक्षक बंधू-भगिनींनी सहकार्य केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *