1 min read

आपण समाजाचे काही देणे लागतो ती जाणीव असु द्या -वरीष्ठ शास्त्रज्ञ व पुणे येथील IISR चे संस्थापक सदस्य डॉ.अरविंद नातू यांचे प्रतिपादन

Loading

आपण समाजाचे काही देणे लागतो ती जाणीव असु द्या -वरीष्ठ शास्त्रज्ञ व पुणे येथील IISR चे संस्थापक सदस्य डॉ.अरविंद नातू यांचे प्रतिपादन

अमळनेर प्रतिनिधी
तुमच्या पाल्याला जर संशोधनाची आवड असेल किंवा विज्ञानशाखेत पदवी संपादन करून आवडीच्या क्षेत्रात करिअर करायचे असेल. तर भारतीय विज्ञान शिक्षण आणि संशोधन संस्थेच्या (आयसर) प्रवेश परीक्षेत नक्की सहभागी व्हा.
सामान्य खेड्यातील मनुष्य देखील चांगला संशोधक होऊ शकतो.ज्यांना मेंदू आहे आणि कोणत्याही परिस्थितीत योग्यप्रकारे वापरता येतो तो व्यक्ती संशोधन करू शकतो.
प्रत्येक शिक्षक हा संशोधक असतो.प्रत्येक विद्यार्थ्यावर आपला निर्णय लादू नका ,त्याला स्वतःला निर्णय घेऊ द्या. आपण समाजाचे काही देणे लागतो ती जाणीव असुद्या .
असे प्रतिपादन वरीष्ठ शास्त्रज्ञ व पुणे येथील IISR चे संस्थापक सदस्य डॉ.अरविंद नातू (अध्यक्ष, IISER कलकत्ता व तिरुवनंतपुरम).यांनी केले.
दि.९ला अमळनेर येथे विज्ञान कार्यशाळा आयोजित करण्यात आली याप्रसंगी “विज्ञान शिक्षण आणि संशोधनातील संधी” या विषयावर ते बोलत होते.जि एस हायस्कूल मधील लायन्स हॉल येथे सदर कार्यक्रम झाला.
प्रा जयदीप पाटील यांनी सांगितले की “आपल्या देशाला नोबल न मिळण्याचे मूळ कारण शोधले तर तरुणांना बेसिक विज्ञाना च्या अभ्यासचा अभाव आहे.म्हणून शाळांमध्ये प्रयोगशाळा अद्ययावत असाव्यात.विज्ञान व भूगोल चा तास हा प्रयोगशाळेतच व्हायला हवेत.
तदपूर्वी अमळनेर तालुका विज्ञान अध्यापक मंडळातर्फे डॉ. नातू यांचा सत्कार करण्यात आला.ह्यावेळी मंडळाचे अध्यक्ष निरंजन पेंढारे, कार्याध्यक्ष डी. के. पाटील, उपाध्यक्ष जगदीश पाटील, आर. एस. पाटील, प्रमिलाअडकमोल,भाग्यश्री वानखेडे, उमेश काटे, मिलिंद पाटील, डी.ए. धनगर, जि. डी. पाटील, दीपक महाजन,गोपाल हडपे, भाग्यश्री सावळे इ. उपस्थित होते
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नोबल फौंडेशनचे संस्थापक प्रा जयदीप पाटील,”मिल के चलो असोसिएशन” चे अध्यक्ष अनिरुद्ध पाटील,कल्याणी पाटील,विनायक पाटील,सेवानिवृत्त मुख्याध्यापक एस. डी. देशमुख,,सिद्धार्थ पाटील हे होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दत्तात्रय सोनवणे यांनी केले तर चंद्रकांत पाटील यांनी आभार मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *