1 min read

विक्रोळीतील दिपक गभाले सरांची कागदा पासून गणेश मूर्ती घडवण्याची अनोखी कला.

Loading

विक्रोळीतील दिपक गभाले सरांची कागदा पासून गणेश मूर्ती घडवण्याची अनोखी कला.

मुंबई प्रतिनिधी
गणेश हिरवे

विक्रोळीतील दिपक गभाले या शिक्षकाने पर्यावरण पूरक गणेश मूर्ती घडवली आहे. विशेष म्हणजे ही मूर्ती 100 रुपयात निर्माण केली असून ह्या मूर्तीच्या डेकोरेशन 300 रुपया पर्यंतच्या एल इडी लाईट स्ट्रीप चा वापर केला गेला आहे. हि मूर्ती घडवण्या साठी साधारण 150 ते 200 ग्रॅम कागदाचा वापर केला आहे. करोना काळा पासून म्हणजेच 2020 साला पासून ते घरच्या घरी गणेश मूर्ती कागदा पासून बनवत आहेत ही मूर्ती बनवन्या साठी ते कुठल्याही साच्याचा वापर करत नाहीत हे विशेष, अजून विशेष बाब म्हणजे सर्वसाधारण कागदाच्या गणेश मूर्ती घडवताना आधी कागदा पासून लगदा तयार केला जातो आणि मग त्या लगद्याला साच्याच्या साहाय्याने मूर्तीचा आकार दिला जातो परंतु दिपक गभाले सर केवळ कागदावर कागद चिकावत गणेश मूर्तीचा आकार साकारतात ही खरोखरच एक अनोखी कला त्यांनी विकसित केली आहे. अशा प्रकारे गणेश मूर्ती बनवण्याची प्रेरणा त्यांना मिळाली ती 2020 मधील जुलै- ऑगस्ट महिन्यात संपूर्ण कुटुंब कोरोणाची लागण झाल्या मुळे होमेकोरोंटीन होते तेव्हा आणि घरी यावर्षी सुद्धा गणेश मूर्तीची स्थापना झाली पाहिजे ह्या विचाराने प्रेरित होवून आणि गणपती बाप्पाच्याच आशीर्वादाने घरच्या घरी गणेश मूर्ती साकारायला सुरुवात केली. गेल्या तीन वर्षापासून दिपक सर कागदाचा वापर करून तयार केलेल्या घरगुती गणेश मूर्तीची स्थापना घरी करत आहेत. पर्यावरण प्रेमी शिक्षक दिपक गभाले हे विकेस इंग्लिश हायस्कूल, विक्रोळी येथे शिक्षक म्हणून कार्यरत आहेत. यांना ही कागदी मूर्ती साकारण्यासाठी तीन आठवडे लागले असून या मूर्तीची उंची ही साधारण 2 फुटापर्यंत आहे. या मूर्तीचे विसर्जन दरवर्षी घरीच टबमध्ये केले जाते. अशा प्रकारे घरच्या घरी गणेश मूर्ती तयार करण्या मागे महत्वाचे कारण की राज्यासह देशभरात गणेश उत्सव मोठ्या भक्तिपूर्ण वातावरणात साजरा केला जातो. अवाढव्य मूर्ती हे एक मुंबईचे आकर्षण ठरले आहे. या मूर्ती पाहण्यासाठी मुंबईकर दरवर्षी गर्दी करत असतात. मात्र दहा दिवस मूर्तीचे पूजन झाल्यानंतर शेवटच्या दिवशी विसर्जन करणे अवघड होते. पीओपीच्या मूर्तीचे विसर्जन पूर्णतः होत नसल्याने नदी किनारी समुद्र किनारी त्या अडकतात. मात्र पर्यावरण पूरक मूर्ती ही कागदी अथवा मातीची साकारल्या नंतर तिचे विसर्जन करणे सोप्पे होते. मूर्ती पाण्यात अर्थात पंचतत्वात विलीन होते. महागाईमध्ये घर चालवणे जसे अवघड झाले आहे तसेच उत्सव साजरे करणेदेखील अवघड झाले आहे. अशात पर्यावरण पूरक उत्सव हे खर्चात परवडणारे आहेत. त्यामुळे पर्यावरणावर त्याचा परिणामदेखील होत नाही, असे शिक्षक दीपक गभाले यांनी सांगितले. तसेच दिपक गभाले सरांनी आपल्या ह्या उपक्रमाची दखल पाठ्यपुस्तक मंडळाने घेवून मुलांना कार्यानुभव विषयात ह्या उपक्रमाचा सामावेश करावा जेणे करून घरो घरी पर्यावरण पूरक गणेश मूर्ती साकारल्या जातील व त्यामुळे गणेश उत्सवात होणारे पर्यावरणाचे प्रदूषण व हानी सुद्धा थांबेल.महत्वाचे म्हणजे ह्या अशा मुर्त्या घरच्या घरी बनवताना घरची मंडळी सुद्धा उत्साहाने सहभागी होतात विशेष करून लहान मुले आणि त्यामुळे ते आपोआप मोबाईल पासून दूर होतात.त्यामुळे जर तुम्हाला तुमच्या मुलांना मोबाईल च्या व्यसना पासून दूर ठेवायचे असेल तर अशाप्रकारचे उपक्रम जरूर घरी राबवा असे दिपक गभाले सर आवर्जून सर्व पालक वर्गाला सांगू इच्छितात. परिसरातील भाविक आणि पर्यावरणप्रेमी त्यांचे या कामगिरीसाठी कौतुक करीत आहेत. अनेकांनी त्याच्या गणपतीचे दर्शन घेऊन या अनोख्या कलेची प्रशंसा केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *