1 min read

चामुंडा माता बहुउद्देशीय विकास परिसर धुळे संचलित परिश्रम दिव्यांग मुला-मुलींची निवासी शाळा पारोळा येथे दहीहंडीच्या उत्सव साजरा

Loading

पारोळा प्रतिनिधी-आज दि. 07/09/2023 गुरुवार रोजी चामुंडा माता बहुउद्देशीय विकास परिसर धुळे संचलित परिश्रम दिव्यांग मुला-मुलींची निवासी शाळा पारोळा येथे दहीहंडीच्या उत्सव साजरा करण्यात आला.बाल गोपाळांच्या जन्मानिमित्त दहीहंडी उत्सव मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. आमच्या परिश्रम दिव्यांग मुला मुलींचे निवासी शाळा पारोळा येथे दहीहंडी उत्सव साजरा करण्यात आला यावेळेस आमच्या शाळेचे आधारस्तंभ माननीय अण्णासाहेब योगेश रघुनाथ महाजन सर तसेच आमचे शाळेचे मुख्याध्यापक माननीय मनीष जाधव सर यांच्या मार्गदर्शनाखाली दहीहंडीच्या उत्सव साजरा करण्यात आला. आमचे दिव्यांग विद्यार्थी यांनी दहिहंडी गाण्यावर ठेका धरला आणि उत्साहाने दहीहंडी फोडली.कार्यक्रमासाठी शाळेचे सर्व विशेष शिक्षक, शिक्षिका व शिक्षक्तेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *