1 min read

राजे उमाजी नाईक यांच्या जयंतीनिमित्त वृक्षारोपण- अमित जगताप

Loading

राजे उमाजी नाईक यांच्या जयंतीनिमित्त वृक्षारोपण- अमित जगताप

लोणी काळभोर-
भारताच्या इतिहासात अनेक ऐतिहासिक घटना घडल्या आहेत काहींची नोंद झाली, काहींची दखलच घेण्‍यात आली नाही. सन १८५७ च्या उठावा अगोदरही अनेक उठाव झाले अशाच पहिल्या उठावाद्वारे इंग्रजांना सलग १४ वर्ष सळो की पळो करून सोडणारे व सर्व प्रथम क्रांतीचे स्वप्न पाहणारे महाराष्ट्रातील निधड्या छातीचे वीर आद्यक्रांतिकारक म्हणजे ‘राजे उमाजी नाईक यांच्या जयंतीनिमित्त तीर्थक्षेत्र रामदरा महादेव मंदिर डोंगर परिसर येथे ग्रीन फाऊंडेशन महाराष्ट्र राज्य च्या वतीने करंज, चिंच, कडुलिंब, शिरस, वावळा अशा जंगली वृक्षांचे रोपण करण्यात आले. या वेळी ग्रीन फाऊंडेशन संस्थापक अध्यक्ष अमित जगताप, संजय धायगुडे,नितीन सुदाम काळभोर, प्रेम वलठे,विकास माळी,अक्षय सावंत, गणेश पातडे उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *