1 min read

प्रताप महाविद्यालयात शिक्षक दिन साजरा

Loading

प्रताप महाविद्यालयात शिक्षक दिन साजरा

अमळनेर प्रतिनिधी : अमळनेर येथील खान्देश शिक्षण मंडळ संचलित प्रताप स्वायत्त महाविद्यालयातील रसायनशास्त्र विभागात डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जन्मदिनानिमित्त दिनांक ५ सप्टेंबर रोजी शिक्षक दिन साजरा करण्यात आला.
शिक्षक दिनाचे औचित्य साधून एम.एस्सी वर्गाच्या विद्यार्थ्यांनी विभागातील प्राध्यापकांचा गुलाब पुष्प व पेन भेट देऊन शिक्षकांचा सन्मान केला.
यावेळी विभागातील विद्यार्थी अंकित सैंदाणे व विद्यार्थिनी डिंपल पाटील हिने गुरुजनांबद्दल कृतज्ञतापर मनोगत व्यक्त केले. रसायनशास्त्र विभागप्रमुख प्रा. डॉ. नीलेश पवार यांनी शिक्षक दिनाच्या निमित्ताने मनोगत व्यक्त केले. यावेळी डॉ. मिलिंद ठाकरे,
डॉ. तुषार रजाळे, प्रा. रामदास सुरळकर, प्रा. संतोष दिपके, डॉ. अमोल मानके, प्रा. वैशाली राठोड, प्रा. हर्षल सराफ, प्रा. प्रीतम बोरसे आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अंकित सैंदाणे या विद्यार्थ्याने केले तर आभार कु. फिरदोस पठाण हिने मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *