रांगोळीकार सुनिल दाभाडे यांनी साकारली अगळी वेगळी थ्रीडी रांगोळी
![]()


रांगोळीकार सुनिल दाभाडे यांनी
साकारली अगळी वेगळी थ्रीडी रांगोळी
जळगाव शहरातील शनी पेठेतील शनी मंदिरात शिवशंकर मंदिरामध्ये श्रावण सोमवार निमित्त महादेवाची विविध साकारत आहे. पहिल्या श्रावण सोमवारी फुलांचा महादेव,थ्रीडी रांगोळी
दुसऱ्या सोमवारी दिव्यांचा महादेव आरास,व तिसऱ्या सोमवारी रांगोळी पासून शिवलिंग थ्रीडी बनविण्यात आले आणि चौथ्या सोमवारी सप्त धान्य शिवलिंग बनवण्यात येणार आहे. तिसऱ्या सोमवारचे रांगोळीचे शिवलिंग बनवण्यात आले त्यात दहा किलो रांगोळी, पाच किलो झेंडूची फुले, पाच किलो बिजलीचे फुल, तीन किलो गुलाबाचे फुल, या सामग्री पासून महादेवाचे शिवलिंग आरास साकारण्यात आले. शिवलिंगाची आरास साकारण्यास चार तासाचा अवधी लागला. ही शिवलिंगाची आरास मानव सेवा शाळेतील कलाशिक्षक ,उपक्रमशील शिक्षक, सुनील दाभाडे सर यांनी रांगोळी मधील आपली कला (थ्रीडी) साकारली .सर्व शिवभक्तांनी अभिनंदन केले.

