1 min read

अमळनेर येथील श्रीमती इंदिरा गांधी विद्या मंदिर शाळेत आज 5 सप्टेंबर डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस साजरा

Loading

डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस साजरा ——–!!!
अमळनेर येथील श्रीमती इंदिरा गांधी विद्या मंदिर शाळेत आज 5 सप्टेंबर रोजी डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस शिक्षक दिन म्हणून साजरा करण्यात आला. सदर प्रसंगी शालेय विद्यार्थ्यांच्या हस्ते डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला.तसेच आज शालेय विद्यार्थ्यांनी शिक्षीकांची भूमिका आगळ्या आणि वेगळ्या पद्धतीने अध्यापन कार्यासह पार पाडली. त्यात पायल गरुड देवयानी साळुंखे, श्वेता थोरात, प्रिया थोरात, निधी इंगळे, तनस्वी भोई, राजश्री थोरात हर्षा सोनार ,धनश्री, कोमल धजे,दिव्या भोई ,इंदिरा संदानशिव दिव्या पाटील ,रिया धनगर ,तसेच शिक्षकांच्या भूमिकेत हर्षल पाटील, आयांन शेख, भूषण लोहार, हेमंत मांडोळे ,कार्तिक भावसार, सुनील गरुड ,प्रेम अहिरे, भावेश लोहार ,भूषण भिल, शालेय कामकाजाच्या दृष्टीने मुख्याध्यापिका म्हणून दिव्या पाटील या सातवीच्या विद्यार्थिनीने व्यवस्थितपणे शिस्तबद्ध भूमिका पार पाडली. सर्व शालेय विद्यार्थ्यांना कार्यक्रमानंतर खाऊ वाटप करून ज्या विद्यार्थ्यांनी शिक्षक -शिक्षिका भूमिका पार पाडली त्यांना योग्य बक्षीस देण्यात आले. तसेच उपक्रमशील शिक्षक डी.ए. सोनवणे यांनी डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जीवन कार्याचा परिचय सर्व विद्यार्थ्यांना सविस्तरपणे करून देण्यात आला. आणि एक शिक्षक देशाच्या सर्वोच्च पदी म्हणजेच राष्ट्रपती पदापर्यंत शिक्षणाच्या जोरावर कशा पद्धतीने विराजमान होतो, हे महत्त्व पटवून दिले. त्यासाठी शिक्षणाची क्रांती तात्यासाहेब महात्मा ज्योतिराव फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या शैक्षणिक क्रांतीमुळेच आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या भारतीय संविधानामुळेच हे सर्व काही शक्य झाले .म्हणून खरे शिक्षणाचे आद्य प्रणेते कोण ? हा आपण सारासार विचार केला पाहिजे. कार्यक्रमानंतर यशस्वीतेसाठी चतुर्थ कर्मचारी अशोक सैंदाणे यांनी सहकार्य केले. सदर कार्यक्रमास शिक्षक व्ही. डी .पाटील, ए.पी .जाधव, डी .एस .कारले ,वाय.जे. पाटील, आर.डी. महाजन ,एम. एस.सुशीर, आणि शिक्षिका व्हि.डी. जाधव, एस. एस .तेले, ए.यू.महाजन, सी.डी. निकम ,पी.पी .पाटील हे आवर्जून उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *