जळगाव जिल्ह्यातील सर्व उ.मा.वि./क.म.वि. शिक्षक – शिक्षकेतर कर्मचारी उद्या दि.५ सप्टेंबर रोजी शिक्षक दिनी काळी फित लावून करणार कामकाज.
![]()

जळगाव जिल्ह्यातील सर्व उ.मा.वि./क.म.वि. शिक्षक – शिक्षकेतर कर्मचारी उद्या दि.५ सप्टेंबर रोजी शिक्षक दिनी काळी फित लावून करणार कामकाज.
मा.शिक्षणाधिकारी सो. (माध्य.जि.प.जळगाव) यांना निवेदन सादर..
जळगाव: महाराष्ट्र राज्य कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक महासंघाच्या आदेशान्वये उद्या दि.५ सप्टेंबर रोजी राज्यातील सर्व उ.मा.वि./क.म.वि. शिक्षकांच्या न्याय्य प्रलंबित मागण्यांकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी काळी फित लावून कामकाज करावयाचे असल्याने तशा आशयाचे निवेदन मा.श्री सचिन परदेशी साहेब (प्रभारी शिक्षणाधिकारी माध्य. जि.प.जळगाव) यांना आज देण्यात आले. यात पुढील मागण्यांचा समावेश होता.
१)१नोव्हेंबर पूर्वी व नंतर सेवेत रुजू झालेल्या सर्व कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करण्यात यावी.
२)आश्र्वासित प्रगती योजना तात्काळ प्रभावाने लागू करण्यात येऊन निवड श्रेणी २०%ची जाचक अट रद्द करण्यात यावी.
३)कनिष्ठ महाविद्यालयीन विद्यार्थी पटसंख्येचे निकष शाळा संहितेनुसार असावेत.
४)वाढीव पदाना रुजू दिनांकापासून मंजुरी देऊन वेतन सुरू करावे.
५)आय.टी.विषयास अनुदानित करावे.
६)कनिष्ठ महाविद्यालयीन उपप्राचार्याना पदोन्नतीची वेतनवाढ देण्यात यावी.
७)एम.एड.एम.फिल.
पीएच.डी धारक उमावि कमवि शिक्षकांना वरिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांप्रमाणे वेतन वाढ द्यावी.
८)विनाअनुदानितकडून अनुदानितकडे बदलीला दि.१डिसेंबरपासून लागू केलेली स्थगिती त्वरित रद्द करण्यात यावी.
सदर मागण्यांसाठी राज्य कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक महासंघ सातत्याने पाठपुरावा करत असून राज्याचा शालेय शिक्षण विभाग मात्र सदर मागण्या विचारातच घेत नसून याला हेतुपुरस्सर केराची टोपली दाखवली जात आहे. फेब्रू/मार्च २०२३ मध्ये झालेल्या राज्यव्यापी उत्तरपत्रिका तपासणी बहिष्काराच्यावेळी पुढील १५ दिवसांत याबाबत सकारात्मक निर्णय घेण्यात येईल असे आश्वासन शालेय शिक्षण मंत्री मा.दिपकजी केसरकर यांनी दिले होते. मात्र त्या आश्वासनाची अद्यापही पूर्तता झालेली नसल्याने राज्यातील सर्व उ.मा.वि./क.म.वि.शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी वर्गात प्रचंड असंतोषाचे वातावरण आहे.
सदर निवेदन देतेप्रसंगी प्रा.नंदन वळींकार (अध्यक्ष), प्रा.सुनील सोनार (सचिव), प्रा.शैलेश राणे,प्रा.सुनील पाटील (कार्याध्यक्ष), डॉ.अतुल इंगळे, प्रा. गजानन वंजारी, प्रा.पी. पी.पाटील (उपाध्यक्ष), प्रा. राजेंद्र चव्हाण (सहसचिव), प्रा.सुनील गरुड (जेष्ठ मार्गदर्शक) प्रा.शशिकांत पाटील (तालुकाध्यक्ष पारोळा), प्रा.सुधाकर ठाकूर अध्यक्ष (जळगाव ग्रामीण), प्रा.राजेश कोष्टी (सचिव जळगाव महानगर), प्रा.योगेश धनगर (महानगराध्यक्ष अंशतः अनुदानित संघटना) प्रा.स्वप्नील पाटील (अमळनेर तालुकाध्यक्ष) प्रा.भगतसिंग निकम, प्रा.गजानन देशमुख, प्रा.संजय पुरी, प्रा.सुरेश मोरे, प्रा.एन.डी.सोनवणे, प्रा.रवींद्र कोल्हेकर आदी उपस्थित होते.

