1 min read

प्रा.श्री.अर्जुनशास्त्री मेटे यांना भारतरत्न लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान.

Loading

प्रा.श्री.अर्जुनशास्त्री मेटे यांना भारतरत्न लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान.

जळगाव : येथील मूळजी जेठा (स्वायत्त) महाविद्यालयाच्या स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालयामधील प्रा.श्री. अर्जुनशास्त्री मेटे यांना शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे), सरदार वल्लभभाई पटेल बहुउद्देशीय विकास संस्था जळगांव, रोटरी क्लब ऑफ जळगाव सेंट्रल यांच्या संयुक्त विद्यमानाने दिला जाणारा मानाचा “भारतरत्न सरदार वल्लभभाई पटेल आदर्श शिक्षक पुरस्कार” आदरणीय सौ.जयश्रीताई महाजन (महापौर) यांच्या शुभ हस्ते व डॉ.ए.जी भंगाळे (प्रख्यात शल्यचिकित्सक), मा.श्री.विष्णूभाऊ भंगाळे (शिवसेना जिल्हाप्रमुख, माजी महापौर/ विद्यमान नगरसेवक),जेष्ठ उद्योजक प्रा.श्री.डी.डी.बच्छाव यांच्या प्रमुख उपस्थितीत नुकत्याच लेवा भवन येथे संपन्न झालेल्या दिमाखदार सोहळ्यात प्रदान करण्यात आला.
प्रा.अर्जुन भगवान मेटे हे पंजाब विश्वविद्यालय (चंडीगढ) येथून संस्कृत विषयात शास्त्री ही पदवी (सिल्वर मेडल) व एम.ए. (संस्कृत) प्रथम श्रेणीमध्ये उत्तीर्ण झाले असून कवी कुलगुरू कालिदास संस्कृत विश्वविद्यालय, रामटेक (महाराष्ट्र) येथून त्यांनी बी.एड.ची पदवी संपादन केली आहे.ते गेल्या १७ वर्षांपासून संस्कृतचे अध्यापन कार्य करीत असून २०१०पासून ते एम.जे. कनिष्ठ महाविद्यालय जळगाव येथे संस्कृताध्यापक म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती मंडळाच्या बालभारती द्वारानिर्मित इ.११वी व १२ वीचे पाठ्यपुस्तक समीक्षक म्हणून काम पाहिले आहे. तसेच ते इ.११ वी व १२वी साठी संस्कृत विषयाचे राज्यस्तरीय विषय तज्ञ मार्गदर्शक असून त्यांनी महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक बोर्ड परीक्षा, मूल्यमापन व विविध कार्यात सक्रीय सहभाग नोंदविला आहे. आत्तापर्यंत त्यांनी १५० पेक्षा अधिक विद्यार्थ्यांना भारत सरकारतर्फे क्रियान्वित केंद्रीय संस्कृत विश्वविद्यालय नवी दिल्ली यांच्याकडून प्रति विद्यार्थ्यांस दिली जाणारी ६००० रुपये शिष्यवृत्ती मिळवून दिली आहे. त्यांच्या कुशल मार्गदर्शनाने दरवर्षी इ. १२वी बोर्डाच्या परीक्षेत अनेक विद्यार्थी संस्कृत विषयात १०० पैकी १०० गुण मिळवत आहेत. संस्कृत विषया संदर्भात अनेक क्षेत्रात त्यांनी उल्लेखनीय कार्य केले असून सध्या ते संस्कृत भाषा प्रचारिणी सभा जळगांवमध्ये सदस्य म्हणून कार्यरत आहेत.
त्यांना आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाल्याबद्दल संस्थाध्यक्ष प्रज्ञावंत श्री. नंदकुमार बेंडाळे, प्राचार्य डॉ. सं.ना.भारंबे व उपप्राचार्य श्रीमती के.जी. सपकाळे पर्यवेक्षक श्री. आर.बी.ठाकरे व सर्व कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *