थकीत सभासद कर्जाच्या बाबत सभासदांनी संचालक मंडळांना धरले धारेवर…
![]()
थकीत सभासद कर्जाच्या बाबत सभासदांनी संचालक मंडळांना धरले धारेवर…
पू.सानेगुरुजी माध्यमिक शिक्षक पतपेढीची 30 वी वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न

अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)
थकीत सभासद कर्जाच्या बाबत संचालक मंडळांना सभासदांनी चांगलेच धारेवर धरले, विविध प्रश्न विचारून सरबत्ती केली. सभासदांना कर्जत थकबाकीमुळे जामीनदारांना कर्ज मिळत नाही त्यामुळे त्यांच्यावर आपण काय उपाययोजना केल्या व सभेत अध्यक्षांनी अहवाल वाचन केले पाहिजे असे सभासद जितू ठाकूर,भूषण पाटील ,संजय पाटील यांनी प्रश्न विचारत संचालक मंडळाला धारेवर धरले. यावर उत्तर देताना साने गुरुजी पतपेढीचे अध्यक्ष सचिन साळुंखे म्हणाले की थकीत कर्जदारांवर कठोर कारवाई केली जाईल असे आश्वासन दिले ते आपल्या अध्यक्षीय भाषणात पूज्य साने गुरुजी माध्यमिक शिक्षक व इतर नोकर वर्गाच्या सहकारी पतपेढीच्या 30 व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत बोलत होते.
व्यासपीठावर उपाध्यक्ष सचिन साळुंखे उपाध्यक्ष राजेंद्र पाटील, मानद सचिव तुषार बोरसे,सौ वसुंधरा लांडगे, संचालिका कविता पाटील, सुलोचना पाटील, कैलास पाटील, जगन्नाथ पाटील, होते.
प्रस्ताविक अहवाल वाचन सानेगुरुजी पतपेढीचे हिशोबणीस अजय पाटील यांनी केले.
अध्यक्ष सचिन साळुंखे व मानद सचिव तुषार बोरसे ,उपाध्यक्ष राजेंद्र पाटील यांनी सांगितले की साने गुरुजी पतपेढीमध्ये सभासद हितांच्या निर्णयालाच प्राधान्य दिले जाते. पतपेढी अ वर्गात असून सभासद हिताच्या वेगवेगळ्या योजना भावी काळात राबवले जातील व सभासद हित जोपासले जाईल. पतपेढीची भरभराट कशी होईल या दृष्टिकोनातून संचालक मंडळ पाऊल टाकत आहे. पतपेढीमध्ये आँडीट रिपोर्ट मध्ये काही चुका असतील तर त्या दुरुस्त करण्यात येतील असे त्यांनी सांगितले .त्यासाठी आपले सर्वांचे सहकार्य असणे अपेक्षित आहे असेही त्यांनी सांगितले.
साने गुरुजी पतपेढीच्या सहविचार सभेत या विषयावर झाली चर्चा..
ऐनवेळी विषयावर सानेगुरुजी पतपेढीचे सभासद जितू ठाकूर,आर.एम.देशमुख ,कुंदन पाटील, एम.ए.पाटील म्हणाले की सभासद वाढविण्यासाठी संचालक मंडळानी प्रयत्नशील राहावे.सहाशे रूपये भत्ता,मयत सभासद निधी साठ हजार ,स.क निधी तिनशे रूपये करण्यात यावा.व सभासद विमा पाच लाखाचा असावा त्यासाठी सभासद यांनी वर्षातून पाचशे चाळीस रुपये एकदा भरावे .व पतपेढीच्या सभासदांना आपल्या खात्याबाबत मेसेज यावा यासाठी संचालक मंडळाने प्रयत्न करावा व त्यांनी होकार दर्शविला.
सानेगुरुजी शिक्षक पतपेढीच्या सभेत सभासदांची विविध पदावर नियुक्ती झाल्याबद्दल, व आदर्श मुख्याध्यापिका श्रीमती अनिता बोरसे मुख्याध्यापक संघाच्या राज्य अधिवेशनात सन्मानित झाल्याबद्दल त्यांचा सत्कार सहविचार सभेत करण्यात आला.विशेष गुण संपादन करणारे विद्यार्थी, सेवानिवृत्त कर्मचारी यांचा सत्कार दोनहजार रूपये रोख,शाल,श्रीफळ,देऊन उच्चशिक्षित
एम एस झालेल्या पाल्यांचा पालक मगर सरांचा सहपत्निक विशेष सत्कार संचालक मंडळ याच्या हस्ते करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संचालक जगन्नाथ शांताराम पाटील यांनी केले तर आभार प्रदर्शन साने गुरुजी पतपेढीचे उपाध्यक्ष राजेंद्र पाटील यांनी मानले.
यावेळी निम हायस्कूलचे मुख्याध्यापक ए.बी.चौधरी,तांबेपूरा हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य एम.ए.पाटील,सेवानिवृत्त मुख्याध्यापक
आर.डी.पाटील,मांडळ हायस्कूल चे बापू चव्हाण, साने गुरुजी हायस्कूलचे मुख्याध्यापक सुनील पाटील, श्रीमती
अनिता बोरसे, एल एन. सैदाणे, प्रकाश पाटील, मनोज पाटील, संजय बोरसे, सुनील पाटील शिक्षक उमेश काटे,संजय पाटील, महेंद्र रामोशे,जितू ठाकूर, ईश्वर महाजन, डीए धनगर, डी के पाटील ,महेश भाऊसाहेब, अनिल महाजन, आर टी बागुल, आर डी चौधरी, एल.जे चौधरी, एन आर चौधरी व साने गुरुजी शिक्षक पतपेढीचे सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते. साने गुरुजी शिक्षक पतपेढीची 30 वी सभा यशस्वी होण्यासाठी साने गुरुजी पतपेढीचे सर्व कर्मचारी यांनी प्रयत्न केले.






