1 min read

मिल के चलो तर्फे वावडे येथे नाविन्यपूर्ण विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन

Loading

मिल के चलो तर्फे वावडे येथे नाविन्यपूर्ण विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन
दिनांक ०१ सप्टेंबर २०२३ रोजी बी. बी. ठाकरे हायस्कूल, वावडे येथील शाळेत मिल के चलो असोसिएशन या सेवाभावी संस्थेतर्फे विज्ञान प्रदर्शन आयोजित करण्यात आले. मिल के चलो असोसिएशनचा चौथा वर्धापन दिन 9 सप्टेंबर 2023 रोजी अमळनेर येथे आयोजित करण्यात आलेला आहे. त्यानिमित्ताने अमळनेर तालुक्यातील काही ठराविक शाळांमध्ये विज्ञान स्पर्धा आयोजित करण्यात आल्या असून संस्थेतर्फे त्याची सुरुवात वावडे येथून करण्यात आली. या प्रत्येक शाळेत पुढील आठवड्यात विज्ञान प्रदर्शन घेतले जातील आणि यात निवडलेले विद्यार्थी अंमळनेर येथील कार्यक्रमाच्या विज्ञान प्रदर्शनात भाग घेतील. आजच्या विज्ञान प्रदर्शनात ३५ विज्ञान प्रयोग प्रतिकृती, २५ पोस्टर आणि २० विदयार्थ्यांनी निबंध स्पर्धेत भाग घेतला. एकूण ८० विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला होता आणि त्यांच्या कामात नाविन्यता तसेच अभ्यासूपणा स्पष्टपणे दिसून आला. परिक्षणानंतर निवडलेल्या विद्यार्थ्यांना लगेच शैक्षणिक साहित्याचे बक्षिस वाटप करण्यात आले. बी.बी. ठाकरे हायस्कूल , वावडे चे मुख्याध्यापक सुनिल पाटील सर आणि सर्व शिक्षक वृंद यांनी मोलाचे सहकार्य केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष सुनिल पाटील सर हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून निवृत्त मुख्या. साहेबराव पाटील सर यांनी मोलाचे मार्गदर्शन केले. सुचसंचलन श्री. प्रल्हाद पाटील सर तर विज्ञान प्रकल्पांचे परिक्षण श्री. निरंजन पेंढारे यांनी केले. तर शाळेचेच माजी विद्यार्थी पोलिस कॉन्स्टेबल श्री. दिपक पाटील, प्रतिष्ठित शेतकरी श्री चंद्रकांत पाटील, पालक प्रतिनिधी श्री दिनकर पाटील व ईतर मान्यवर उपस्थित होते. मंचावर मिल के चलो चे पदाधिकारी इंजिनीयर अनिरुद्ध पाटील, इजि. कल्याणी पाटील, सदस्य सौ. करुणा पाटील , इंजि. विनायक पाटील हे उपस्थित होते. विज्ञान प्रदर्शनाचे संपूर्ण नियोजन मिल के चलो संस्थेचे सहकारी श्री. चेतन वैराळे, वैष्णवी ठाकरे, सौ. प्रिया ठाकरे यांनी विद्यार्थ्यांच्या मदतीने उत्कृष्ठ रित्या केले होते. गावातील तरुण वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता . जिल्हा परिषद शाळा वावडे येथील सर्व विद्यार्थी , गुरुजन , विद्यार्थ्यांचे पालक,गावातील मान्यवर मंडळी यांनी या प्रदर्शनाचा लाभ घेतला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *