हिंदी अध्यापक मंडळाची सहविचार सभा संपन्न
![]()
हिंदी अध्यापक मंडळाची सहविचार सभा संपन्न
अमळनेर प्रतिनिधी-हिंदी अध्यापक मंडळ अमळनेर शाखेची सहविचार सभा अमळनेरला उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अध्यापक मंडळाचे अध्यक्ष आशिष शिंदे होते. सहविचार सभेचे प्रस्ताविक सचीव दिलीप पाटील यांनी केले.
१४ सप्टेंबर हिंदी दिनानिमित्त तालुकास्तरावर सामान्य ज्ञान स्पर्धा आयोजित करण्याबाबत सर्वोनमते ठरले.
पाचवी ते सातवी व आठवी ते दहावी ग्रामीण व शहरी असे दोन गट ग्रामीण व शहरी करण्यात आले आहेत.यावर्षी विविध कार्यक्रम घेण्याबाबत विचार करण्याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. मुख्याध्यापक म्हणून हिंदी अध्यापक मंडळाचे जिल्हा कार्यकारणी सदस्य एन.आर चौधरी यांची वर्णी लागल्यामुळे मंडळाच्या वतीने सत्कार करून त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या.
हिंदी अध्यापक मंडळाच्या कार्याचा लेखाजोखा मंडळाचे सचिव दिलीप पाटील यांनी मांडला. आगामी काळामध्ये राबवायची उपक्रम याबाबत सविस्तर चर्चा मंडळाचे अध्यक्ष आशिष शिंदे यांनी केले. व सर्व कार्यक्रमांना मंडळाच्या सर्व सदस्यांनी संमती दर्शवली.
यावेळी मंडळाचे अध्यक्ष आशिष शिंदे
उपाध्यक्ष ज्ञानेश्वर ईनशुलकर,खजीनदार राजेंद्र पाटील,सचीव दिलीप पाटील,जिल्हा प्रतिनिधी एन आर चौधरी
मार्गदर्शक सोपान भवरे, सदस्य कमलाकर संदानशिव प्रदीप चौधरी,मुनाफ तडवी,
योगेश्वरी पाटील मँडम,कविता मनोरे मँडम
प्रसिद्धी प्रमुख ईश्वर महाजन होते.सहविचार सभेचे आभार प्रदर्शन ज्ञानेश्वर ईनशुलकर यांनी मानले.



