1 min read

माजी आमदार साथी गुलाबराव पाटील
यांची २ सप्टेंबर ला अमळनेर
येथे सर्वपक्षीय शोकसभेचे आयोजन

Loading

माजी आमदार साथी गुलाबराव पाटील
यांची २ सप्टेंबर ला अमळनेर
येथे सर्वपक्षीय शोकसभेचे आयोजन

अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)
अमळनेर येथे महाराष्ट्राची मुलुख मैदान तोफ, शिंगाडे मोर्चा चे प्रणेते, विधानसभा गाजवणारे,समाजवादी विचारांचे खंदे समर्थक मा.आ. साथी गुलाबराव पाटील यांची सर्वपक्षीय शोक सभा शनिवार, २ सप्टेंबर २०२३ रोजी दुपारी ४.०० वाजता पूज्य साने गुरुजी विद्यालय, अमळनेर येथे आयोजित करण्यात आली आहे.
अमळनेर परिसरातली विविध संस्थांमध्ये गुलाबराव बापू यांचा प्रत्यक्ष अप्रत्यक्ष संबंध होता.
गुलाबराव बापू राजकीय जीवनात राहूनही विविध चळवळींना सक्रिय पाठिंबा देत, कार्यकर्त्यांच्या आणि चळवळीच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहत होते.
कार्यकर्ते एका सच्चा मार्गदर्शकाला मुकले अशी भावना आहे. आजच्या ह्या कठीण काळात बापूंचे सोबत असणे हे आपली सगळ्यांची ताकद वाढवीत होते, त्यांचे असणे एक आश्वासक होते.
स्व. गुलाबराव पाटील यांच्या शोक सभेस विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थिती देणार आहेत. पांबोगिता खोऱ्यातील समाजवादी सूर्य 22 ऑगस्ट 2023 रोजी मावळला. शेतकऱ्यांच्या प्रश्नांच्या संदर्भात आक्रमक
भूमिका मांडणारे,शिंगाडे मोर्चा काढणारे, अमळनेरच्या क्रांतीचा इतिहास सतत जिवंत ठेवणारे, आपल्या
विचारसरणीशी समाजवादी, सत्यशोधकी व समाज परिवर्तनाचा ध्यास घेणारे बापू होते. पांझरा बोरी गिरणा
तापी(पांबोगीता) या नद्यांच्या खानदेशी खोऱ्यातील एक सच्चा समाजवादी, परिवर्तनाचा वाटसरू त्यांच्या
आठवणींना उजाळा देत जाईल. त्यांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करूया…
आपण या शोक सभेस उपस्थित रहावे असे आवाहन भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिव सेना, भारतीय जनता पार्टी, आम आदमी पार्टी, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया, वंचित बहुजन आघाडी, भारतीय कम्युनिस्ट पार्टी(CPM), भारतीय कम्युनिस्ट पक्ष (CPI), कृषी उत्पन्न बाजार समितीअमळनेर, शेतकरी सहकारी संघ अमळनेर, अमळनेर फ्रूट सेल सोसायटी, खान्देश शिक्षण मंडळ अमळनेर, राष्ट्र सेवा दल, लोक संघर्ष मोर्चा, मंगल ग्रह मंदिर सेवा संस्था अमळनेर, एन मूक्टो, कनिष्ठ
महाविद्यालय शिक्षक संघटना अमळनेर, शिक्षक भारती, मराठा सेवा संघ, जिजाऊ ब्रिगेड, संभाजी ब्रिगेड, युवा
कल्याण प्रतिष्ठान, ओबीसी विद्यार्थी, पालक शिक्षक असोसिएशन अमळनेर, शिक्षण प्रसारक मंडळ, साने गुरुजी ज्येष्ठ नागरिक संघ अमळनेर, व्यापारी असोसिएशन अमळनेर, बार कौन्सिल ऑफ इंडिया अमळनेर, अमळनेर महिला मंच, आय.एम.ए., केमिस्ट असोसिएशन, निमा, हिमा, श्रीमती भानुबेन बाबूलाल शाह गो शाळा, राष्ट्रीय किसान मोर्चा, बामसेफ, मौर्य क्रांती संघ, अमळनेर नगर परिषद सफाई कामगार संघटना, युथ सेवा फौडेशन, आदिवासी पारधी विकास परिषद, प्रहार संघटना, बहुजन रयत परिषद, टी.डी.एफ. (शिक्षक लोकशाही आघाडी), पाडळसे धरण जनआंदोलन समिती, महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ, व्हॉइस ऑफ मीडिया, हमाल मापाडी संघटना, अमळनेर शहर टॅक्सी युनियन, तालुक्यातील सर्व शैक्षणिक, सांस्कृतिक, राजकीय व सामाजिक संघटना व बापूंवर प्रेम करणारे सर्व बंधुभगिनीनी उपस्थित राहावे असे एका पत्रकाद्वारे आवाहन केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *