अतिरिक्त “शिक्षक” ठरवितांना शिक्षकांवर अन्याय करू नका – अनिल बोरनारे
![]()

अतिरिक्त “शिक्षक” ठरवितांना शिक्षकांवर अन्याय करू नका – अनिल बोरनारे
मुंबई,ठाणे (मनिलाल शिंपी) संचमान्यतेनुसार शिक्षक अतिरिक्त ठरवितांना अतिरिक्त ठरविण्याच्या सर्व निकषांचे पालन करा कोणत्याही शिक्षकांवर अन्याय होणार नाही याची काळजी घ्या असे आवाहन भाजपा शिक्षक आघाडीचे प्रदेश सहसंयोजक व मुंबई मराठी अध्यापक संघाचे अध्यक्ष अनिल बोरनारे यांनी केले आहे.
मुंबईतील विविध शाळांमध्ये शैक्षणिक वर्ष २०२२-२३ च्या संचमान्यतेनुसार विद्यार्थी संख्या कमी झालेल्या शाळांमध्ये शिक्षकांना अतिरिक्त ठरविले जात असून यामध्ये सेवाजेष्ठ असूनही शिक्षकांना अतिरिक्त ठरविले जात असून संबंधित शिक्षकांना लेखी न कळविता त्यांची नावे अतिरिक्त म्हणून शिक्षण विभागाकडे पाठविली जात आहेत. शाळेची विद्यार्थी संख्या कमी झाल्यास शिक्षक अतिरिक्त ठरतो शिक्षकाला अतिरिक्त ठरवितांना सेवाजेष्ठता, अनुशेष व विषयाची गरज हे निकष तपासून शिक्षकाला अतिरिक्त ठरविलं जाते. संबंधित शिक्षकाला तसे लेखी कळवावे लागते याबाबत शिक्षण निरीक्षकांनी दि २१ ऑगस्ट रोजी शाळांना तसे लेखी आदेशही दिले होते तरीसुद्धा अनेक शिक्षकांना शाळांनी लेखी कळविले नसून परस्पर नावे शिक्षण विभागाकडे पाठविली असल्याच्या तक्रारी आहेत
अन्याय झालेल्या शिक्षकांनी संपर्क करावा
नियमांना डावलून जर अतिरिक्त केले तर शिक्षकांनी त्वरित लेखी हरकत घ्यावी व त्याची एक प्रत शिक्षण निरीक्षक कार्यालयात पाठवून आमच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन भाजपा शिक्षक आघाडीचे प्रदेश सहसंयोजक व मुंबई मराठी अध्यापक संघाचे अध्यक्ष अनिल बोरनारे यांनी केले आहे
चौकटीत

