प्रताप महाविद्यालयाच्या वतीने पोलीस स्टेशनमध्ये रक्षाबंधन साजरी
![]()
प्रताप महाविद्यालयाच्या वतीने पोलीस स्टेशनमध्ये रक्षाबंधन साजरी

अमळनेर : येथील प्रताप महाविद्यालयातील वाणिज्य विभाग आणि राष्ट्रीय सेवा योजना यांच्या संयुक्त विद्यमाने आज रक्षाबंधनाच्या निमित्ताने अमळनेर पोलीस स्टेशनमध्ये जाऊन जनतेची रक्षा करणाऱ्या पोलीस बांधवांना प्रताप महाविद्यालयाच्या विद्यार्थिनींनी राखी बांधून एक सामाजिक सलोखा जपला. पोलीस स्टेशन मधील सर्व बांधवांनी महाविद्यालयाच्या विद्यार्थिनी भगिनींचे रक्षाबंधानाच्या निमित्ताने आभार मानून शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाच्या संयोजनासाठी प्राचार्य डॉ. ए.बी.जैन यांचे मार्गदर्शन लाभले.
याप्रसंगी वाणिज्य विभाग प्रमुख डॉ. योगेश तोरवणे, अधिसभा सदस्य प्रा. डॉ. संदीप नेरकर, प्रा. नितीन पाटील, राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा. डॉ. हेमंत पवार, प्रा. किरण सूर्यवंशी, प्रा. डॉ.किरण भागवत, प्रा. डॉ.अवित पाटील, प्रा.डॉ. ज्ञानेश्वर मराठे, प्रा. डॉ. अनिल झळके, प्रा.नेहा पवार, प्रा. पलाशा शाह, यांसह महाविद्यालयाच्या विद्यार्थिनी उपस्थित होते.

