विदयाविहार काँलनीत
विद्येश्वर महादेव मंदीराची स्थापना उत्साहात संपन्न..
![]()
विदयाविहार काँलनीत
विद्येश्वर महादेव मंदीराची स्थापना उत्साहात संपन्न..
अमळनेर प्रतिनिधी-विदयाविहार काँलनीतील भाविकांचे श्रध्दास्थान विद्येश्वर महादेव मंदीरात महादेवाची,नंदी,व गणपती व दुर्गादेवी,राधाकृष्ण यांची स्थापना करण्यात आली.अमळनेर तालुक्यातील एकमेव मंदिर आहे.यासाठी अनेक भाविकांनी महादेवाच्या मंदिरात दर्शन व पुजा केली.
आज बारा वाजता कळसाची स्थापना,होम वहन सकाळी 9 ते 11 वाजता झाली व मुर्तीची स्थापना 11 वाजता तर कळसाची स्थापना 12 वाजता करण्यात आली. यावेळी महामंडेलेश्वर स्वामी हसानंद तिर्थजी महाराज कपीलेश्वर मंदिर येथील महाराज यांच्या हस्ते स्थापना करण्यात आली.
मंदिरात प्रवचन करण्यात आले. नंतर महादेव मंदीरातील पुजा आर्चा या संदर्भात सखोल माहिती महामंडेलेश्वर महाराज यांनी सांगितली.त्यांचा सत्कार सामाजिक कार्यकर्ते रवींद्र पिंताबर पाटील यांनी सहपत्निक केला तर होम वहन साठी सात सहपत्निक भाविक बसले होते.
यावेळी महादेव स्थापनेसाठी व कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संजय पाटील, सुनील शिंगाणे, अशोक साळुंखे, राहुल शिंपी, अशोक जाधव,प्रविण गुजर,सचीन शिंपी, मिलिंद वारूळे,कपील पाटील, राकेश गोसावी, राज वाणी,मधुकर देसाई, साहेबराव पाटील, वसंत पाटील, बापूगिर गोसावी,प्रा देविदास जगताप,प्रविण वाघ,भरत पाटील सर, सह अनेक विदयाविहार काँलनीतील नागरिक व महिला प्रयत्न केले.





