डोंबिवली स्काऊट गाईडव रोटरी औद्योगिक ग्रुप तर्फे वृक्षदिंडी कार्यक्रम व रक्षाबंधन कार्यक्रम संपन्न
![]()


डोंबिवली स्काऊट गाईडव रोटरी औद्योगिक ग्रुप तर्फे वृक्षदिंडी कार्यक्रम व रक्षाबंधन कार्यक्रम संपन्न
ठाणे,कल्याण ,(मनिलाल शिंपी):26 ऑगस्ट 2023 रोजी डोंबिवली भारत स्काऊट आणि गाईड स्थानिक संस्था व रोटरी क्लब ऑफ डोंबिवली औद्योगिक विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने वृक्षदिंडी कार्यक्रम आयोजित करण्यात आला. वृक्षदिंडी ची सुरुवात रामनगर पोलीस स्टेशनचे पोलीस अधिकारी व रोटरी क्लब ऑफ डोंबिवलीचे सर्व पदाधिकारी ,डोंबिवली भारत स्काऊट गाईड स्थानिक संस्थेचे पदाधिकारी यांच्या उपस्थितीत झेंडा दाखवून करण्यात आली. वृक्षदिंडी ची सुरुवात रामनगर पोलीस स्टेशन पासून बाजीप्रभू चौक चार रस्ता टिळक नगर विद्यामंदिर येथे समारोप करण्यात आला. वृक्षदिंडी मध्ये सर्व शाळेच्या स्काऊट गाईड यांनी पर्यावरण जनजागृती व झाडे लावा झाडे जगवा चे फलक तयार करून घोषणांच्या जयजयकाराने डोंबिवली शहर दुमदुमले होते.कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून ठाणे जिल्हा संघटक आयुक्त गाईड माननीया सौ हेमांगी पाटील, ठाणे जिल्हा संघटक आयुक्त स्काऊट श्री किरण लहाने, रोटरी क्लब ऑफ डोंबिवली औद्योगिक विभागाचे अध्यक्ष श्री महेंद्र भोईर, सचिव श्री किरण डहाळे, खजिनदार श्री शरद गंभीरराव डोंबिवली भारत स्काऊट गाईड स्थानिक संस्थेचे अध्यक्ष श्री अशोक जगताप, सचिव श्री जगदीश उगले, आर एस पी कमांडर श्री मनिलाल शिंपी, उपाध्यक्ष श्री एकनाथ चौधरी ,खराटे सर सल्लागार श्री नरेंद्र राणे स्काऊट मास्टर श्री चंद्रकांत खैरनार, श्री जितेश पाटील, श्री प्रशांत पाटील, श्री इस्माईल तडवी लवलेश मिश्रा ,गाईड कॅप्टन प्रतिभा जाधव, सौ नूतन कुराडे, सौ.लीना शिंपी सौ. सरिता तिवारी तसेच रोटरीयन दिनेश खरोटे , राजेश पटेल , प्रकाश शहा, नंदू मालवणकर, अवधेश उपाध्याय , गजानन भाग्यवंत , सुरेश जोशी , मंगेश जाधव ,सुनील फलदेसाई , तुषार मानकर टिळक नगर पोलीस स्टेशनचे हवालदार राहुल मांडगे सर तसेच सर्व शाळांचे स्काऊट मास्टर गाईड कॅप्टन उपस्थित होते.सर्वप्रथम उपस्थित मान्यवरांचे स्वागत स्थानिक संस्था उपाध्यक्ष श्री एकनाथ चौधरी सर यांनी केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक स्थानिक संस्थेचे अध्यक्ष अशोक जगताप यांनी केले, सर्व प्रमुख पाहुण्यांचा डोंबिवली भारत स्काऊट गाईड स्थानिक संस्थेतर्फे पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला.त्यानंतर रोटरी क्लब ऑफ डोंबिवलीचे माजी अध्यक्ष आदरणीय प्रकाश शहा यांनी सर्व उपस्थित स्काऊट ,गाईड यांना मोलाचे मार्गदर्शन केले. त्यानंतर रोटरी क्लब ऑफ डोंबिवलीचे खजिनदार शरद गंभीरराव यांनी देखील विद्यार्थ्यांना अनमोल असे मार्गदर्शन केले .ठाणे भारत स्काऊट गाईड जिल्हा संस्थेचे जिल्हा संघटक आयुक्त स्काऊट किरण लहाने यांनी सर्व उपस्थित विद्यार्थ्यांना स्काऊट गाईड विषयी माहिती सांगितली. हेमांगी पाटील जिल्हा संघटक आयुक्त गाईड यांनी उपस्थित सर्व विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. टिळकनगर पोलीस स्टेशन चे हवालदार राहुल मांडगे यांनी उत्कृष्ठ गीत गायन करून आर. एस. पी. अधिकारी शिक्षक युनिट चे डॉ.मनिलाल शिंपी यांनीही सर्व स्काऊट व गाईड यांना मार्गदर्शन करताना वाहतुकीचे नियम सर्वांनी पाळावेत आणि अपघात टाळावेत यासाठी जनजागृती करावी असे आवाहन केले. उपस्थितांचे मनोरंजन केले.संपूर्ण कार्यक्रमात शिस्तीचे नियोजन स्थानिक संस्थेचे सल्लागार श्री नरेंद्र राणे सर यांनी केले.
त्यानंतर सनराईस इंग्लिश स्कूलच्या गाईड कॅप्टन यांनी सामूहिक प्रार्थना घेऊन विद्यार्थ्यांमध्ये चैतन्य निर्माण केले.
संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्थानिक संस्थेचे सचिव जगदीश उगले सर यांनी केले. वृक्षारोपण कार्यक्रमानंतर सर्व शाळेच्या गाईड कॅप्टन यांनी उपस्थित सर्व मान्यवर यांना राखी बांधून व सर्व गाईड यांनी सर्व स्काऊट यांना राखी बांधून रक्षाबंधन कार्यक्रम साजरा करण्यात आला.कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन स्थानिक संस्थेचे अध्यक्ष श्री अशोक जगताप सर यांनी केले.
या कार्यक्रमासाठी डोंबिवलीतील एकूण 19 शाळेच्या 200 पेक्षा जास्त स्काऊट गाईड व प्रकाश विद्यालयाच्या बँड पथकाने सहभाग घेतला. संपूर्ण वृक्षादिंडी साठी रामनगर पोलीस स्टेशन वाहतूक शाखा यांनी अत्यंत उत्कृष्ठ असा बंदोबस्त दिला .कार्यक्रमात १९ शाळांनी सहभाग घेतला.
गार्डियन स्कूल,टिळकनगर विद्यामंदिर,ज्ञानेश्वरी विद्यालय,
न्यू सनराईस इंग्लिश स्कूल,जय भारत इंग्लिश हायस्कूल, शाह जयेश मोनजी हायस्कूल, स. हैं.जोंधळे विद्यामंदिर गुजराती माध्यमिक, मॉडेल इंग्लिश स्कूल, डी एन सी स्कूल, शेठ श्री के बी वीरा हायस्कूल, साऊथ इंडियन हायस्कूल, ओमकार इंग्लिश स्कूल, शिवाई बालक मंदिर, मंजुनाथ विद्यालय , प्रकाश विद्यालय,
जे के पाटील इंग्लिश मिडीयम स्कूल भोपर
डॉन बॉस्को हायस्कूल
ग्रींस इंग्लिश स्कूल डोंबिवली पूर्व
प्रकाश विद्यालय बँड पथकाने कार्यक्रमाची शोभा वाढवली.
डोंबिवलीतील वृक्षदिंडी मध्ये सहभागी झालेल्या सर्व शाळेच्या मुख्याध्यापक सर्व स्काऊट मास्टर, गाईड कॅप्टन .इथून पुढे देखिल आपण स्थानिक संस्थेला असेच सहकार्य कराल अशी अपेक्षा व्यक्त केली.
डोंबिवली भारत स्काऊट आणि गाईड स्थानिक संस्था डोंबिवली चे सचिव
जगदीश उगले यांनी उपस्थीत सर्व स्काऊट गाईड शिक्षक, आणि विद्यार्थी, पालक यांचे विशेष आभार व्यक्त केले.

