दर्शना गवते दिव्यांग कोट्यातून नॅशनल पिस्तोल शूटिंग स्पर्धेसाठी निवड
![]()


दर्शना गवते दिव्यांग कोट्यातून नॅशनल पिस्तोल शूटिंग स्पर्धेसाठी निवड
अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)
जिद्द, चिकाटी, व आत्मविश्वास राहीला तर विद्यार्थी सर्व संकटावर मात करत यशस्वी होऊ शकतो.हे दिव्याग दर्शना राजेंद्र गवते या विद्यार्थ्यांनींने सिद्ध करून दिले आहे.
सविस्तर माहिती अशी कि फापोरे बुद्रुक तालुका अमळनेर केंद्राचे केंद्रप्रमुख राजेंद्र गवते यांची सुकन्या कु.दर्शना राजेंद्र गवते अहमदाबाद येथे झालेल्या ऑल इंडिया 10 th वेस्ट झोन पिस्तोल शूटिंग स्पर्धेमध्ये 356/400 गुण मिळवून जनरल/दिव्यांग कोट्यातून नॅशनल पिस्तोल शूटिंग स्पर्धेसाठी भोपाळ येथे निवड झाली.
तिचे अभिनंदन गटशिक्षणाधिकारी रावसाहेब पाटील, विश्वासराव पाटील, आर.डी.महाजन,शिक्षणाविस्तराधिकारी सौ सुर्वे मँडम, पी.डी.धनगर,तालुक्यातील केंद्रप्रमुख ,मुख्याध्यापक, शिक्षक यांनी अभिनंदन व शुभेच्छा दिल्या.

