1 min read

सार्वजनिक विद्यालयाच्या विद्यार्थिनींनी देशाच्या सैनिकांसाठी राख्या पाठवल्या.

Loading

सार्वजनिक विद्यालयाच्या विद्यार्थिनींनी देशाच्या सैनिकांसाठी राख्या पाठवल्या.

अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)

भाऊ आणि बहिणीच्या नात्याशी बांधिलकी जोपासणारा सण आणि उत्सव हा भारतीय संस्कृतीच्या एक चांगल्या अशा परंपरेतून नात्याला दृढ करणारा हा उत्सव या अनुषंगाने सार्वजनिक विद्यालयात भारतीय सीमेवर लढणाऱ्या सैनिकांना रक्षाबंधनाच्या दिवशी राख्या प्राप्त व्हाव्यात या हेतूने अनोखा उपक्रम राबविण्यात आला कवयित्री बहिणाबाई चौधरी यांच्या प्रतिमेला संस्थाध्यक्ष विलासराव चौधरी, सभासद शशिकांत चौधरी, मुख्याध्यापक डॉ. मिलिंद बागुल, पर्यवेक्षक एल .जे.पाटील ज्येष्ठ शिक्षक एन . एम.भंगाळे या उपक्रमाचे संयोजक शिक्षिका शुभांगीनी महाजन, वृषाली चौधरी यांच्या उपस्थितीत विद्यार्थिनींनी आपल्या हाताने तयार केलेल्या राख्या सैनिकांना पोस्टाच्या माध्यमातून पाठवण्यात आल्या या अगोदर सैनिकांशी त्यांचे कार्यक्षेत्राचे पत्ते आणि फोन नंबर उपलब्ध करून घेत त्यांच्याशी संवाद साधून त्यांना या उपक्रमाची कल्पना देण्यात आली सैनिकांनी तेवढाच चांगला प्रतिसाद देत विद्यार्थिनींना फोनवरून सदिच्छा दिल्यात उपक्रमात धनश्री शिंपी, प्रज्ञा कापडणे, हेमांगी पाटील, तेजल भोळे, रिया पाटील, आदिती कोल्हे, मिताली भारुळे ,ममता चौधरी, पल्लवी कोळी, हर्षदा सपकाळे , प्रमिता बिराडे , भाग्यश्री चौधरी, फाल्गुनी कोल्हे, गायत्री चौधरी, साक्षी पाटील, भाग्यश्री कोळी, गायत्री सपकाळे, दीक्षा पाचपांडे, तेजस्विनी ढाके, योगिता माळी, रूपाली सोनवणे, दिपाली कोळी या उपक्रमात सहभागी होत्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शुभांगीनी महाजन यांनी तर के.बी. तायडे यांनी आभार मानले.

फोटो कँप्शन
सैनिकहो तुमच्यासाठी… या उपक्रमांतर्गत सहभागी असणाऱ्या विद्यार्थिनी समवेत संस्थाध्यक्ष विलासराव चौधरी, सभासद शशिकांत चौधरी, डॉ. मिलिंद बागुल, के.बी. तायडे,वृषाली चौधरी, शुभांगीनी महाजन, एन. एम. भंगाळे, एल.जे.पाटील.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *