स.है जोंधळे विद्यामंदिरात आजादी का अमृत महोत्सव निमित्त विविध उपक्रमांचे आयोजन
![]()


स.है जोंधळे विद्यामंदिरात आजादी का अमृत महोत्सव निमित्त विविध उपक्रमांचे आयोजन
*मुंबई,ठाणे( मनिलाल शिंपी ): डोंबिवली येथील स.है जोंधळे विद्यामंदिरात आजादी का अमृत महोत्सव निमित्त विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी मेरी मिट्टी मेरा देश,
अभियान राबविण्यात आले या अभियाना अंतर्गत कालावधीत जोंधळे विद्यालयामध्ये विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. प्रभातफेरी,निबंधस्पर्धा, वसूधानमन,हर घर तिरंगा ध्येय समोर ठेवून शुर वीरांना वंदन करण्यात आले.
मेरी मिट्टी मेरा देश अभियानाचे महत्त्व पटविण्यासाठी व जनजागृती करण्यासाठी शाळेच्या परिसरातच प्रभात फेरी काढण्यात आली. प्रभात फेरीमध्ये विद्यार्थ्यांबरोबर काही पालकांनीही उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला .
कालावधीत शाळेत ध्वजारोहन करण्यात आले. विद्यार्थ्यांनी ही दिलेल्या सूचनांचे पालन करत तिन्ही दिवस स्वतःच्या घरी तिरंगा फडकविला. देश प्रेमाचे बाळकडू कृतीतून पाजले गेले. मेरी मिट्टी मेरा देश या अभियानांतर्गत निबंध स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे या स्पर्धेत भाग घेतला देशाप्रतिचा अभिमान त्यांच्या प्रत्येक शब्दातून व्यक्त होत होता.
14 ऑगस्टला वीरोंको नमन हा उपक्रम आयोजित करण्यात आला होता,
प्रत्येक वर्गांतून शिक्षकांनी मुलांना वीरांच्या शौर्यगाथा ऐकविल्या होत्या त्यामुळे दुसर्या दिवशी जोंधळे शाळेच्या परीसरात विद्यार्थ्यांमध्ये वीररस ओसंडून वाहत होता.
आपल्या देशात होऊन गेलेल्या अनेक वीरांचे स्मरण करून विद्यार्थी नतमस्तक झाले होते. शाळेच्या मुख्याध्यापकांनी मुलांना देशासाठी प्राणाची आहूती देणाऱ्या वीर जवानांची माहिती दिली.
देश प्रेमाने भारावलेल्या वातावरणात सर्व विद्यार्थ्यांनी वीरांना नमन केले. जय हिंद चा नारा आभाळभर दुमदुमला.
वसूधा नमन— आपल्या मातीचे महत्त्व मुलांना पटवून देण्यात आले.
वृक्षारोपण व वृक्षजतन करण्यासाठी चे महत्व मुलांना समजावण्यात आले. मैदानावर उपमुख्याध्यापक .आर्. आर्. वदक यांच्या हस्तेही वृक्षारोपन करण्यात आले. विद्यार्थ्यांनीही स्वतःहून काही रोपे मैदानावर लावले व ही रोप जतन करण्याचे त्यांनी आश्वासनही दिले. वृक्षारोपण झाल्यानंतर ह्या वसुधेला वंदन करण्याचा उपक्रमही आम्ही घेतला व सर्व शिक्षक व विद्यार्थ्यांनी मिळून आपल्या वसुधेला वंदन केले.
या सर्व उपक्रमांत शाळेचे सर्व पदाधिकारी तसेच संचालक माननीय सागर जोंधळे व शाळेचे मुख्याध्यापक निकम सर , उपमुख्याध्यापक वदक सर व पर्यवेक्षक कोळेकर सर व सर्व शिक्षक वृंद यांचे सहकार्य लाभले.

