सार्वजनिक विद्यालयात कवयित्री बहिणाबाई चौधरी यांच्या जयंती निमित्त विविध गुणदर्शनाचा कार्यक्रम.
![]()
सार्वजनिक विद्यालयात कवयित्री बहिणाबाई चौधरी यांच्या जयंती निमित्त विविध गुणदर्शनाचा कार्यक्रम.
असोदा – सार्वजनिक विद्यालयात कवयित्री बहिणाबाई चौधरी यांच्या जयंतीनिमित्त विविध गुणदर्शनाच्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. याप्रसंगी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे सभासद शशिकांत चौधरी होते.संस्थाध्यक्ष विलासराव चौधरी, मुख्याध्यापक डॉ.मिलिंद बागुल, पर्यवेक्षक एल. जे. पाटील, एन. एम. भंगाळे, के.बी.तायडे उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते कवयित्री बहिणाबाई चौधरी यांच्या प्रतिमेस माल्यार्पण करण्यात आले. याप्रसंगी हेमांगी पाटील,स्वाती कुंभार व इतर विद्यार्थ्यांनी कवयित्री बहिणाबाई चौधरी यांच्या जीवनाविषयी त्यांच्या साहित्या विषयी माहिती सांगितली आदिती कोल्हे तिच्या मैत्रिणी रुचिता सूर्यवंशी व तिच्या मैत्रिणींनी बहिणाबाईंच्या कवितांवर नृत्य सादर केले इयत्ता दहावी क ची विद्यार्थिनी छाया सोनवणे हिने बहिणाबाईची वेशभूषा साकारली या कार्यक्रमाच्या निमित्ताने विद्यार्थ्यांनी विविध गुणदर्शनाचा कार्यक्रम सादर केला या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी स्वाती वाघुळदे या होत्या. जी.आर. महाजन यांनी बहिणाबाईंच्या कवितेविषयी विद्यार्थ्यांना माहिती विषद केली. गायत्री कोळी तर आभार प्रदर्शन सचिन जंगले यांनी केले.
फोटो..कवयित्री बहिणाबाई चौधरी यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करताना शशिकांत चौधरी, विलासराव चौधरी, डॉ. मिलिंद बागुल, के.बी. तायडे, शुभांगीनी महाजन, एन . एम.भंगाळे, एल .जे.पाटील आणि विद्यार्थी.


