चांद्रयन ३ च्या यशाचा स्वामी मुक्तानंद हायस्कूलमध्ये जल्लोष
![]()
चांद्रयन ३ च्या यशाचा स्वामी मुक्तानंद हायस्कूलमध्ये जल्लोष
स्वामी मुक्तानंद हायस्कूल चे विद्यार्थी इस्रो च्या वैज्ञानिकांना लिहिणार अभिनंदन पत्रे


मुंबई,ठाणे(मनिलाल शिंपी) चांद्रयन ३ च्या चंद्रावरील लँडिंग झाल्याचा चेंबूरच्या स्वामी मुक्तानंद हायस्कूलच्या शिक्षक व विद्यार्थ्यांनी जल्लोष साजरा केला असून शाळेचे विद्यार्थी इस्रो च्या वैज्ञानिकांना अभिनंदन पत्रे लिहिणार आहेत
शाळेचे मुख्याध्यापक विवेक थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली शाळेच्या एल यु गडकरी सभागृहात शाळेचे उपमुख्याध्यापक अप्पासाहेब शेळके यांनी प्रास्ताविक करून चांद्रयन ३ च्या यशाबद्दल भारताच नाव संपूर्ण विश्वात मोठ्या आदराने घेतले जात असून विद्यार्थ्यांनी संशोधन क्षेत्राकडे वळण्याचा सल्ला दिला तर शाळेचे शिक्षक अनिल बोरनारे यांनी चांद्रयन ३ चे लँडिंग झाल्यानंतर चांद्रयन नेमके कोणते काम करणार आहेत याबाबत विद्यार्थ्यांना सांगितले
यावेळी विद्यार्थ्यांना चांद्रयन ३ च्या लँडिंगचे मोठया स्क्रीनवर थेट प्रक्षेपण दाखविले. लँडिंग यशस्वी झाल्यावर विद्यार्थ्यांनी भारत माता की जय व वंदे मातरम च्या घोषणा दिल्या तसेच शिक्षकांनी विद्यार्थ्यांना चॉकलेट वाटून आनंदोत्सव साजरा केला कार्यक्रमाच्या शेवटी “जय हो” गाण्याच्या ठेक्यावर हातात तिरंगा धरून विद्यार्थ्यांनी नृत्य केलं.

