उज्जैनकर फाउंडेशनचे दुसरे राज्यस्तरीय शिव बाल, किशोर व युवा मराठी साहित्य संमेलना साठी पुढील मान्यवरांची राहणार उपस्थिती
![]()

उज्जैनकर फाउंडेशनचे दुसरे राज्यस्तरीय शिव बाल, किशोर व युवा मराठी साहित्य संमेलना साठी पुढील मान्यवरांची राहणार उपस्थिती
शिवचरण उज्जैनकर फाउंडेशन मुक्ताईनगरचे दुसरे राज्यस्तरीय शिव बाल, किशोर व युवा मराठी साहित्य संमेलन 27 ऑगस्ट 2023 रोज रविवारला श्रीपाद कृष्ण कोल्हटकर साहित्य नगरी व भारताचे संविधान सभेचे सदस्य भवनजी अर्जंनजी खिमजी व्यासपीठ ए.के. नॅशनल हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज खामगाव जिल्हा बुलढाणा या ठिकाणी संपन्न होत आहे या संमेलनासाठी संमेलनाच्या अध्यक्षा तसेच फाउंडेशनच्या राज्य समन्वयक व भरारी प्रकाशन मुंबईच्या सौ. लता वाल्मीक गुठे संमेलनाच्या निमंत्रक तथा ए.के. नॅशनल हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज खामगावच्या प्राचार्या डॉ. प्रवीण शहा संमेलनाचे स्वागताध्यक्ष श्री किशोर गरड सर संमेलनाचे उद्घाटक महाराजा अग्रसेन रिसॉर्ट चिखलीचे श्री अशोक अग्रवाल तर या संमेलनाचे संयोजक या विद्यालयाचे पर्यवेक्षक डॉ. प्रवीण क्षीरसागर सर संमेलनाचे कार्याध्यक्ष येथील उद्योगपती श्री विनोदभाऊ डिडवानिया सहकार्य अध्यक्ष खामगाव येथील आयुर्वेदाचार्य डॉ. दीपक पाचपोर तर सह निमंत्रक खामगाव येथील इतिहासकार संशोधक तथा लेखक डॉ. किशोर वानखडे सहसंयोजक फाउंडेशनचे बुलढाणा जिल्हा संघटक तथा संजीवनी बहुउद्देशीय शिक्षण प्रसारक संस्था केळवद ता. चिखली जि. बुलढाणाचे अध्यक्ष डॉ. निवृत्ती जाधव तसेच फाउंडेशनचे राज्य अध्यक्ष ज्येष्ठ विचारवंत अमरावती येथील डॉ. सतीश तराळ फाउंडेशनचे राज्य उपाध्यक्ष महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध लेखिका पुणे येथील डॉ. प्रतिमा इंगोले फाउंडेशनचे राज्य संपर्कप्रमुख कोल्हापूर येथील राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त शिक्षक तथा राज्य पुरस्कार प्राप्त साहित्यिक डॉ. श्रीकांत पाटील फाउंडेशनचे राज्य सचिव छत्रपती संभाजीनगर येथील साहित्यिक प्रा. डॉ.सुभाष बागल आदी मान्यवर साहित्यिक पदाधिकारी यांची उपस्थिती आहे सकाळी या संमेलनाचा सुरुवात ग्रंथदिंडीने होणार असून त्यानंतर उद्घाटन सत्र असेल त्याच प्रमाणे तापी पूर्णा राज्यस्तरीय साहित्य व इतर पुरस्काराने राज्यातील विविध जिल्ह्यातील 27 मान्यवरांना गौरविण्यात येणार आहे तसेच विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी पंधे गुरुजी चित्र प्रदर्शनीचे सुद्धा उद्घाटन करण्यात येईल तसेच सदानंद शिंनगारे परिसंवाद व्यासपीठामध्ये अध्यक्ष श्री राजेश राजोरे, खामगाव तर सय्यद अहमद कथाकथन व्यासपीठामध्ये अध्यक्ष श्री रामदादा मोहिते खामगाव कवी संमेलनाचे अध्यक्ष श्री बाळकृष्ण अमृतकर सर, पुणे तसेच सांस्कृतिक कार्यक्रमातील सहभागी शाहीर मनोहरराव पवार शाहीर प्रमोद दांडगे लोकशाहीर डी चंद्रकांत, सर्व बुलढाणा व आरोही देवगिरीकर, नांदुरा या गायिकेचा सुद्धा सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये सहभाग आहे तसेच कवी भगवान ठग काव्य संमेलन व्यासपीठामध्ये बुलढाणा जिल्ह्यातील व महाराष्ट्रातील विविध नामवंत कवी सहभागी होणार आहेत तसेच स्थानिक ए.के. नॅशनल हायस्कूल व जुनिअर कॉलेजचे शिक्षक बंधू, भगिनी व विद्यार्थी सुद्धा विविध सत्रात सहभागी होणार आहेत. महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातील कवी साहित्यिक लेखक साहित्यिक या संमेलनाला मोठ्या प्रमाणावर उपस्थिती देणार असल्याचे या संमेलनाचे आयोजक व शिवचरण उज्जैन कर फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष डॉ. शिवचरण उज्जैनकर यांनी कळविले आहे. याप्रसंगी उज्जैनकर फाउंडेशनचे महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातील पदाधिकारी, साहित्यिक उपस्थिती देणार आहेत या संमेलनाला परिसरातील जिल्ह्यातील विविध साहित्यिक रसिकांनी उपस्थिती द्यावी भेट द्यावी असे आव्हान सुद्धा या संमेलनाच्या निमंत्रक प्राचार्य डॉ. प्रविणा शहा यांनी केले आहे. या संमेलनासाठी ए.के. नॅशनल हायस्कूल व जुनियर कॉलेजचे शिक्षक डॉ.प्रविण क्षीरसागर श्री प्रवीण जमधाडे व शिक्षक बंधू-भगिनी प्रयत्नशील आहेत.

