1 min read

इस्रोच्या प्रयत्नांना सर्व धर्मीय प्रार्थनेचा बूस्टर,
अमळनेरला मंगळ ग्रह सेवा संस्थेतर्फे थेट प्रक्षेपणाचा जाहीर उपक्रम

Loading

इस्रोच्या प्रयत्नांना सर्व धर्मीय प्रार्थनेचा बूस्टर

अमळनेरला मंगळ ग्रह सेवा संस्थेतर्फे थेट प्रक्षेपणाचा जाहीर उपक्रम

अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)

येथील मंगळ ग्रह सेवा संस्थेने शहराच्या मध्यवर्ती असलेल्या नेताजी सुभाषचंद्र बोस चौकात चांद्रयान ३ चे चंद्रावर उतरण्याचे थेट प्रक्षेपण भव्य स्क्रीनवर दाखवले. त्याचा हजारो नागरिकांनी मनमुराद आनंद लुटला. या उपक्रमास महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ , व्हॉईस ऑफ मीडिया व लायन्स आणि लिनेस क्लब यांनी सहकार्य केले. यावेळी चांद्रयान ३ ची मोहीम यशस्वी व्हावी यासाठी सर्व धर्मियांतर्फे प्रार्थना करण्यात आली. त्यात हिंदू धर्मियांतर्फे मंगळ ग्रह मंदिराचे पुरोहित सौरभ वैष्णव व मंदार कुलकर्णी, मुस्लिम धर्मियां तर्फे रियाज मौलाना, बोहरी समाजातर्फे शकील आमीन, जैन समाजातर्फे प्रशांत सिंघवी, बौद्ध समाजातर्फे भंते नागसेन, ख्रिश्चन समाजातर्फे सिस्टर जॉयस व सिस्टर जॉमि, शीख धर्मियां तर्फे प्रितपालसिंग बग्गा व रवींद्रसिंग कालरा या सर्वांनी आपापल्या धर्माची वैयक्तिक प्रार्थना केली. पोलीस निरीक्षक विजय शिंदे यांनी नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या पुतळ्यास माल्यारपण केले. चांद्रयान ३ चंद्राजवळ पोहोचत होते तसा नागरिकांचा उत्साहही शिगेला पोहोचत होता.” भारत माता की जय ” च्या घोषणांनी वातावरण कमालीचे रोमांचक व जल्लोषपूर्ण झाले होते. चांद्रयान ३ ने चंद्राला स्पर्श करताच देशप्रेमयुक्त आनंद जल्लोष यांच्या उधाणाचे सर्व प्रकारचे बॉम्ब फुटले. ढोल ताशाच्या गजरात वय आणि पद विसरून सर्वांनी खूप वेळ मनमुराद नृत्याचा आनंद लुटला.
यावेळी प्रीतपालसिंग बग्गा यांनी त्यांच्यातर्फे सर्व उपस्थितांना पाण्याच्या बाटल्या वाटप केल्या. लायन्स क्लब तर्फे चॉकलेट देऊन तर मंगळ ग्रह सेवा संस्थेतर्फे गोडशेवचा प्रसाद देऊन उपस्थितांची तोंडे गोड करण्यात आली.
यावेळी जयंतीलाल वानखेडे, अजय भामरे दिलीप गांधी, महेश कोठावदे, विनोद अग्रवाल, हेमंत पवार, पंकज मुंदडे ,दिलीप जैन राजू नांढा ,प्रसन्न जैन, जितेंद्र पारख, प्रवीण जैन ,अनिल रायसोनी, प्रसन्न शाह, सुबोध पाटील ,सुनील भोई, राजेंद्र यादव ,प्रमोद पाटील, विवेक भांडारकर, मकसूद भाई बोहरी, ताहा बुकवाला आदींसह अनेक मान्यवर उपस्थित होते. मंगळ ग्रह सेवा संस्थेचे अध्यक्ष डिगंबर महाले ,उपाध्यक्ष एस. एन .पाटील, सहसचिव दिलीप बहिरम, खजिनदार गिरीश कुलकर्णी, विश्वस्त अनिल अहिरराव ,जयश्री साबे सेवेकरी उज्वला शाह, आशा महाले ,विनोद कदम ,राहुल पाटील जी.एस. चौधरी आदींसह अनेक मान्यवर उपस्थित होते.सर्व तांत्रिक बाबी आशीष चौधरी यांनी सांभाळल्या. डिगंबर महाले यांनी सूत्रसंचालन केले.
पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *